Highway Horror: 2 Arrested with 135 kg Ganja and 45 Lakh Worth Vehicles in Panvel
Panvel Highway Horror राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्र.2 पनवेल विभागाने केला तक्का परिसरात 45 लाखाच्या गांजासह वाहन जप्त ; दोन आरोपी ताब्यात
पनवेल : राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्र.2 पनवेल विभागाने पनवेल जवळील तक्का येथे आज 2 दोन आरोपींना ताब्यात घेवून त्यांच्याकडून जवळपास 45 लाखाच्या गांजासह गुन्ह्यात वापरलेले वाहन जप्त केले आहे.
पनवेल मुंब्रा हायवेच्या डाव्या बाजुस स्टार वेल्डींग समोर, तळोजे पाचनंद, से. नं. 40, तळोजे येथे 2 दिवसापूर्वी 1 कोटी रूपये किमंतीचा जास्त किमंतीचा गांजा हा अंमली पदार्थाचा मोठासाठा व एक चारचाकी एक्सयुव्ही 500 वाहन जप्त केले होते. व दोन आरोपींना अटक केलेली होती. सदर आरोपींना कार्यालयात चौकशीकामी आणले असता आरोपी परवेझ शेख याचे मोबाईलवर एका अनोळखी इसमाचा कॉल आला त्याने अंकल मी पनवेल येथे माल घेऊन आज सायंकाळी 5 ते 6 वाजे दरम्यान ईनोव्हा गाडीने येत आहे असे बोलला सदर इसमाशी राज्य उत्पादन शुल्क अधिकारी यांनी सुध्दा ते अंकलच आहेत असे बोलून त्याला तु सदर माल घेऊन तक्का पनवेल येथे जुना मुंबई-पुणे रोडवर पंचमुखी मारूती मंदिर समोर ये असे बोलले.
त्यानुसार बातमीच्या ठिकाणी हनोझ होशी इंगीनीर (इंजिनियर) रा. लोणावळा, व दिवा उंबरे यांना चारचाकी वाहन ईनोव्हाने ते मालासह तक्का पनवेल येथे आले व अलगद पणे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सापळयात अडकले. सदर आरोपींच्या ताब्यातून 135 किलो गांजासह एक चारचाकी ईनोव्हा वाहन असा एकुण 45,75,000/-रूपये किमंतीचा मुद्देमाल ताब्यात घेतला. सदर आरोपी विरूध्द पंचनामा कारवाई नोंद करून एन.डी.पी.एस. अँक्ट कलम 8 (क), 20(ब)(1),29 तसेच भा. द. स. कलम 328 प्रमाणे सह आरोपी म्हणून अटक केली. सदर कारवाई डॉ. विजय सुर्यवंशी (भा. प्र. से.) आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य मुंबई प्रसाद सुर्वे संचालक (अ. व. द.) राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य मुंबई, प्रदिप पवार उप-आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, कोकण विभाग ठाणे, आर. आर. कोले, अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क, रायगड-अलिबाग यांचे मार्गदर्शनाखाली, निरीक्षक आर. डी. पाटणे, निरीक्षक उत्तम आव्हाड, दुय्यम निरीक्षक डी. सी. लाडके, दुय्यम निरीक्षक एन. जी. निकम, दुय्यम निरीक्षक प्रविण माने, दुय्यम निरीक्षक कृष्णा देवरे, दुय्यम निरीक्षक अजित बडदे, दुय्यम निरीक्षक गणेश कुदळे तसेच सहा. दु. नि. जी. सी. पालवे, सखाराम पवार हे सहभागी होते. सदरील गुन्हयाचा पुढील तपास आर. आर. कोले, अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क, रायगड-अलिबाग यांचे मार्गदर्शनाखाली निरीक्षक आर. डी. पाटणे हे करत आहेत.