Hemant Soren : मी हेमंत सोरेन, झारखंडला 14 वे मुख्यमंत्री मिळाले, शपथविधीला इंडिया आघाडीचे अनेक नेते उपस्थित होते.
Hemant Soren oath Ceremony: हेमंत सोरेन यांनी गुरुवारी (28 नोव्हेंबर) झारखंडचे 14 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राज्यपाल संतोष कुमार गंगवार यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.
ANI :- हेमंत सोरेन Hemant Soren यांनी गुरुवारी (28 नोव्हेंबर) पुन्हा एकदा झारखंडच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारली. रांची येथे आयोजित एका भव्य समारंभात त्यांनी राज्याचे 14 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.राज्यपाल संतोष कुमार गंगवार यांनी सोरेन यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. झारखंड मुक्ती मोर्चा (JMM) नेत्याची मुख्यमंत्री म्हणून ही चौथी टर्म आहे.
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, आपचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या वेळी उपस्थित होते.यासोबतच झामुमोचे राष्ट्रीय अध्यक्ष शिबू सोरेन आणि त्यांच्या पत्नी रुपी सोरेनही शपथविधीवेळी उपस्थित होते.
याशिवाय समाजवादी पक्षाचे अध्यक्ष आणि यूपीचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव, आरजेडी नेते आणि बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव, झारखंड काँग्रेसचे प्रदेश प्रभारी गुलाम अहमद मीर, काँग्रेस नेते तारिक अन्वर, अपक्ष खासदार पप्पू यादव,तामिळनाडूचे उपमुख्यमंत्री आणि द्रमुक नेते उदयनिधी स्टॅलिन, कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार आणि इतर अनेक नेते उपस्थित होते. महाराष्ट्राच्या अनेक नेत्यांनी या कार्यक्रमाला दांडी मारण्याचे पाहायला मिळाले आहे.
इंडिया आघाडीने 81 सदस्यीय विधानसभेत 56 जागा मिळवून आपले बहुमत राखले, तर भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएने 24 जागा जिंकल्या.