Mahaparinirvan Diwas: भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर 68 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त तगडा पोलीस बंदोबस्त
Mahaparinirvan Diwas: महापरिनिर्वाण दिनानिमित्त 6 डिसेंबर रोजी मुंबईत स्थानिक सुटी जाहिर करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले आहेत. तसेच 6 डिसेंबर रोजी मुंबईत ड्राय डे घोषित करण्यात आला आहे.370 पोलीस अधिकारी आणि 3100 पोलीस अंमलदार तैनात
मुंबई :- भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 68 व्या महापरिनिर्वाण Mahaparinirvan Diwas दिनानिमित्त प्रशासनाकडून जोरदार तयारी सुरू आहे. बाबसाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी देशभरातून लाखो अनुयायी दादर येथील चैत्यभूमीवर जमा होतात. त्यांची गैरसोय होणार नाही यासाठी मुंबईतील वाहतूक Mumbai Traffic व्यवस्थेत बदल करण्यात आले आहे. मोठ्या प्रमाणात पोलीस Mumbai Police बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.दरम्यान, महापरिनिर्वाण दिनानिमित्त 6 डिसेंबर रोजी मुंबईत स्थानिक सुटी जाहिर करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले आहेत. तसेच 5 डिसेंबर रोजी सायंकाळपासून व 6 डिसेंबर रोजी दिवसभर मुंबईत ड्राय डे घोषित करण्यात आला आहे.
पोलिसांचा मोठा फौजफाटा
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 68 वा महापरिनिर्वाण दिना निमित्त बृहन्मुंबई शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याकरिता पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई,विशेष पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई यांच्या मार्गदर्शनानुसार पोलीस सह आयुक्त (का. व सु.), बृहन्मुंबई ह्यांचे देखरेखीखाली बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आलेले आहे.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 68 वा महापरिनिर्वाण दिन सुरक्षितपणे पार पाडण्याकरीता मुंबई पोलीस दलाकडून किमान 03 अपर पोलीस आयुक्त, 05 पोलीस उप आयुक्त, 14 सहायक पोलीस आयुक्त यांच्यासह 370 पोलीस अधिकारी व 3100 पोलीस अंमलदार तसेच वाहतुक नियमनाकरीता मुंबई पोलीस दलाकडुन स्वतंत्र असा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. त्यांचे सोबत महत्वाच्या ठिकाणी एस.आर. पी.एफ. प्लाटून, जलद प्रतिसाद पथक (क्युआरटी), दंगल नियंत्रण पथक, डेल्टा, कॉम्बॅक्ट, बीडीडीएस पथक अशा चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेले आहे.