क्राईम न्यूज

Kashid Beach News : प्रसिद्ध काशिद समुद्रकिनाऱ्यावर 55 लाखांचे चरस जप्त; कोकणात खळबळ

Murud Police Caught 55Lakh Worth Drug in Kashid : अंमली पदार्थ तस्करांना धडकी, पोलिसांच्या धाडीमुळे साठा किनाऱ्यावर टाकून दिल्याची शक्यता

रायगड :- पर्यटकांच्या पसंतीस उतरलेल्या रायगड जिल्ह्यातील काशिद समुद्रकिनाऱ्यावर 11 किलोपेक्षा जास्त वजनाचा आणि सुमारे 55 लाख रुपयांचा चरस आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. अज्ञात व्यक्तींनी एका गोणीत हा साठा भरून किनाऱ्यावर ठेवल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी मुरुड पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, हा साठा किनाऱ्यावर कसा आला याचा सखोल तपास सुरू आहे.

काशिदच्या किनाऱ्यावर संशयास्पद गोणी असल्याची माहिती मुरुड पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी तपासणी केली असता, त्यात 11 किलो 148 ग्रॅम वजनाचा चरस सापडला, ज्याची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत 55 लाख 74 हजार रुपये आहे. हा साठा जप्त करण्यात आला असून, पुढील तपासणीसाठी नमुने पाठवण्यात आले आहेत.

पोलिसांच्या माहितीनुसार, जिल्हा पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांनी पदभार स्वीकारल्यानंतर जिल्ह्यात अमली पदार्थ तस्करीविरोधात ‘झिरो टॉलरन्स’ मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत ठिकठिकाणी धाडी टाकण्यात आल्या आहेत. त्यामुळे, पोलिसांच्या कारवाईच्या भीतीने तस्करांनी हा मोठा साठा किनाऱ्यावर सोडून दिला असावा, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

यापूर्वी काही दिवसांपूर्वीच मुरुड आणि अलिबाग परिसरात अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या एका टोळीला पोलिसांनी अटक केली होती. या कारवाईत नेपाळ आणि उत्तर प्रदेश मार्गे अमली पदार्थ आणून स्थानिक व्यावसायिकांच्या मदतीने त्यांची विक्री केली जात असल्याचे उघड झाले होते. आता काशिद किनाऱ्यावर सापडलेल्या या मोठ्या साठ्यामुळे, या भागातील अमली पदार्थ तस्करीचे जाळे किती मोठे आहे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

vivek

Recent Posts

मुंबई पालिकेचा ‘महा’बजेट: 80,952 कोटींचा विकास आराखडा! फेरीवाल्यांना आता ‘QR कोड’चे सुरक्षा कवच, तर अनधिकृत बांगलादेशींवर कठोर कारवाई

Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…

16 hours ago

मुंबईचा ‘महा’अर्थसंकल्प: 80,952 कोटींची विकासाची झेप! राखीव निधीतून 13 हजार कोटींचा अंतर्गत डोस, निवडणुकीनंतर पालिकेचा खजिना खुला

Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…

16 hours ago

Supriya Sule : राज्यसभेचा ‘पेच’ सुटणार? शरद पवारांच्या उमेदवारीसाठी सुप्रिया सुळेंचे ‘दिल्ली मिशन’; तर ठाकरेंच्या शिवसेनेचाही जागेवर दावा

•पुढील दोन दिवस पवारांची प्रकृती तपासणी | सुप्रिया सुळे काँग्रेस श्रेष्ठींना भेटणार | 'आदित्य' हट्ट…

21 hours ago