ठाणेमुंबई
Trending

Thane Kopari Fire News : कोपरीत गॅरेजला भीषण आग!

Thane Kopari Fire News : अग्निशमन दलाच्या एकतासाच्या शर्थीच्या प्रयत्नांनी आगीवर नियंत्रण

ठाणे :- ठाणे स्थानकालगत असलेल्या कोपरी भागातील ‘सोनू ऑटो पार्ट्स अँड गॅरेज’ला सोमवारी सकाळी भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. Thane Fire News सकाळी 8 वाजेच्या सुमारास गॅरेजमध्ये अचानक धुराचे लोट आणि ज्वाळा दिसू लागल्यानं परिसरात काही काळासाठी खळबळ उडाली. सकाळच्या धावपळीच्या वेळेस आणि बाजारपेठेच्या नाक्यावर ही घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं.

घटनेची माहिती मिळताच ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभाग, अग्निशमन दल, कोपरी पोलीस, महावितरण व अन्य यंत्रणांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जवळपास एक तासाच्या अथक प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणण्यात यश आलं. आगीत कोणीही जखमी झालं नाही हे सुदैवच म्हणावं लागेल.

काय झालं नुकसान?

या दुर्घटनेत गॅरेजमधील सहा भंगार दुचाकी, दोन लाकडी कपाटे, तीन लोखंडी रॅक, पंधरा लिटर इंजिन ऑईलचे डब्बे, इलेक्ट्रिक वायरिंग आणि प्लास्टिक-लाकडी साहित्य जळून खाक झालं. आग लागण्याचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नसून यासंदर्भात तपास सुरू असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

कोपरी हा परिसर दिवसभर गजबजलेला असून तेथील कपडा बाजार आणि वाहन दुरुस्ती केंद्रांमुळे नेहमीच वर्दळीचा असतो. त्यामुळे अशी घटना घडल्यावर नागरिकांमध्ये प्रचंड गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. सुदैवाने यंत्रणांच्या वेळीच झालेल्या कार्यवाहीमुळे मोठा अनर्थ टळला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0