Hasan Mushrif : राजकीय हेतूंच्या आरोपांना मागे टाकत खटला निकाली,याचिका निकाली, पण अटकेपासून मिळालेला दिलासा कायमच
मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ Hasan Mushrif यांना मोठा कायदेशीर दिलासा मिळाला आहे. फसवणुकीच्या आरोपांखाली दाखल गुन्हा कोल्हापूर पोलिसांनी बंद करण्याचा अहवाल बुधवारी मुंबई उच्च न्यायालयात सादर केला. यामुळे न्यायालयाने मुश्रीफ यांनी दाखल केलेली गुन्हा रद्द करण्याची याचिका निकाली काढली.
न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती राजेश पाटील यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. कोल्हापूर जिल्ह्यातील मुरगूड पोलीस ठाण्यात 23 फेब्रुवारी 2023 रोजी विवेक कुलकर्णी यांच्या तक्रारीवरून हसन मुश्रीफ यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, हा गुन्हा राजकीय हेतूंनी प्रेरित असल्याचा आरोप करत, मुश्रीफ यांनी गुन्हा रद्द करण्याची मागणी केली होती.
दरम्यान, या प्रकरणात मुश्रीफ यांना न्यायालयाकडून पूर्वीच अटकेपासून अंतरिम दिलासा मिळाला होता. आता कोल्हापूर पोलिसांनीच गुन्हा बंद करण्याची भूमिका घेतल्याने याचिकेचा निर्णय निघणे अपेक्षित होते.
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…