Harshvardhan Patil : हर्षवर्धन पाटलांचे थेट शिंदे- फडणवीसांना पत्र,मित्रपक्षांकडून तालुक्यात फिरून देण्याची धमकी
Harshvardhan Patil Threat News : भाजपाचे नेते हर्षवर्धन पाटील यांचा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र, पत्रात मित्र पक्षांवर आरोप
पुणे :- लोकसभा निवडणुका Loksabha Election 2024 जशजशा जवळ येतील तसे राजकीय वातावरण तापू लागले आहे. एकीकडे महाविकास आघाडीसह, महायुतीमध्ये जागा वाटपांवरुन मित्रपक्षांमध्येच वाद रंगत असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. अशातच भाजप नेते हर्षवर्धन पाटील Harshvardhan Patil यांना इंदापूर तालुक्यामध्ये फिरू न देण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. स्वतः हर्षवर्धन पाटील यांनी यासंबंधी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहित चिंता व्यक्त केली आहे.
हर्षवर्धन पाटील गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र
मा. ना. श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब
उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री
महाराष्ट्र राज्य
महाराष्ट्र राज्यामध्ये महायुतीचे सरकार आपल्या मार्गदर्शनाखाली योग्य पध्दतीने कामकाज करीत आहे. परंतु माझ्या तालुक्यामध्ये मी आपल्या नेतृत्वाखाली राजकिय व सामाजिक जिवनात काम करत असताना इंदापूर मधील मित्र पक्षांचे काही पदाधिकारी राजकीय जाहीर मेळावे व सभांमधून माझेवरती अतिशय खालच्या पातळीवर, एकेरी व शिवराळ भाषेत बेताल वक्तव्य करीत आहेत. त्याचबरोबर तालुक्यामध्ये फिरू न देण्याची धमकी देत आहेत. त्यामुळे मला माझ्या सुरक्षिततेची चिंता वाटत आहे.
सदरील बाब अतिशय गंभीर असून, आपण यामध्ये तात्काळ लक्ष घालावे. अशा गुंड प्रवृत्तींच्या लोकांना वेळीच आळा घालणे आवश्यक आहे. तरी आपण या बाबत ठोस भूमिका घेउन योग्य त्या कारवाईचे आदेश देऊन सहकार्य करावे, हि विनंती.