Handewadi Road: Garbage truck hits tree, bike rider dies due to broken branch; Offenses against officials
Pune Corporation Fir | वानवडी पोलिसांकडून गुन्हा दाखल
पुणे, दि. ६ सप्टेंबर, मुबारक जिनेरी (महाराष्ट्र मिरर) Pune Corporation Fir
हांडेवाडी रस्त्यावरील सातवनगर परिसरात घनकचरा विभागाच्या वाहनाने आंब्याच्या झाडाला दिली आणि झाडाची फांदी तुटून पाठीमागून येणाऱ्या दुचाकीस्वराचा मुर्त्यू झाला. याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात वाहन चालक, उद्यान विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Pune Corporation महापालिकेतील अधिकारी, कर्मचारी यांच्यावर गुन्हा नोंद झाल्याने पालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे.
पंडित फकिरा पाटील, वय – ५८, वैष्णवी हौसिंग सोसायटी, आदर्श नगर, हांडेवाडी असे मृत्युमुखी झालेल्या इसमाचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, पंडित फकिरा पाटील यांचा डबे पुरविण्याचा व्यवसाय आहे. ८ ऑगस्ट रोजी पत्नी समवेत डबे पुरवठा करण्यासाठी दुचाकीवरून जात असताना त्याच्या पुढे असणाऱ्या घनकचरा विभागाचे वाहनाने वाहन बेदरकारपणे चालवत आंब्याच्या झाडाला धडक दिली. जोरात धडक बसल्याने झाडाची फांदी तुटली. मागून येत असणारे पंडित पाटील व त्यांच्या पत्नी गीता पाटील यांच्या अंगावर थेट फांदी पडल्याने त्यांच्या अपघात झाला. त्यांना उपचारासाठी हॉस्पिटलला दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान पंडित फकिरा पाटील यांचा मुर्त्यू झाला.
याबाबत पत्नी गीता पाटील यांनी तक्रार दाखल केल्यावरून वाहन चालक, उद्यान विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्याविरुद्ध Pune Police वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…