पुणे

हडपसर : गावठी बनावटीचे पिस्तुल आणि जिवंत काडतुस बाळगणारा गजाआड

•Pune Crime News : हडपसर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक हसन मुलाणी यांच्या श गुप्त बातमीदारामार्फत खात्रीशीर अशी माहिती मिळाली

पुणे :- गावठी बनावटीचे पिस्तुल आणि एक जिवंत काडतुस बाळगल्याप्रकरणी हडपसर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने चिराग संजय सर्जेराव (वय 23) याला सापळा लावून हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील परिसरातून अटक केली. सर्जेराव यांच्या विरोधात हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.

पोलीस उपनिरीक्षक हसन मुलाणी, पोलीस अंमलदार दिपक कांबळे, अभिजीत राऊत, महेश चव्हाण, तुकाराम झुंजार यांचे पथक पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंदे तसेच वाहन चोरीस प्रतिबंध करण्याकरिता पेट्रोलींग करीत असताना पोलीस अंमलदार महेश चव्हाण आणि अभिजीत राऊत यांना त्यांचे बातमीदाराचे मार्फत बातमी मिळाली की, एक इसम संशयितरित्या कोणता तरी दखलपात्र गुन्हा करणेचे उद्देशाने आपले कब्जात काहीतरी संशयित चिजवस्तु आपले जवळ बाळगुन वावरत आहे. मिळालेल्या बातमीचा आशय संजय मोगले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन पुणे यांना कळवली असता, त्यांचे मार्गदर्शनाखाली व सुचनांप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक हसन मुलाणी, दिपक कांबळे, अभिजीत राऊत, महेश चव्हाण, तुकाराम झुंजार यांचे पथकाने सापळा रचून चिराग संजय सर्जेराव (वय 23 रा- अभिलाषा हाईट्सच्या मागे, डिलाईट प्राईड म्हसोबा वस्ती, झी मॉलचे समोर, मांजरी) यास ताब्यात घेतले. त्यावेळी त्याची दोन पंचा समक्ष अंगड़ाडती घेतली असता त्याच्याकडे 01 देशी बनावटीचा कटटा व 1 जिवंत काडतूस मिळून आले. हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उप निरीक्षक हसन मुलाणी हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0