क्राईम न्यूजठाणेमुंबई
Trending

Gutkha Racket Busted : गुटखा माफियावर गुन्हे शाखेचा जबरदस्त धडाका!

Gutkha Racket Busted By Crime Branch : ८७ लाखांचा अवैध गुटखा जप्त; राजस्थानचा आरोपी कल्याणमध्ये गजाआड!

कल्याण :– राज्यात प्रतिबंध असूनही गुटखा माफिया डोके वर काढताच ठाणे गुन्हे शाखेने जबर कारवाई करत ८७ लाख ३७ हजारांचा अवैध गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थ जप्त केला आहे. Gutkha Racket Busetd गुजरातहून आयशर टेम्पोमधून महाराष्ट्रात हा मुद्देमाल आणणारा धनराज रामगोपाल स्वामी (रा. लक्ष्मणगढ, जि. सीकर, राजस्थान) याला कल्याण पश्चिम येथील गांधारी ब्रिज चौकात गुन्हे शाखा, घटक ३ ने रंगेहात पकडले. Kalyan Crime Branch Unit 3

वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित शिंदे यांना खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर पथकाने गुरुवारी (दि. १७ ऑक्टोबर) पहाटे साडेपाचच्या सुमारास सापळा रचून ही मोठी कारवाई केली. आरोपीच्या ताब्यातून ८७,३७,४७२ रुपयांचा प्रतिबंधित गुटखा आणि तंबाखूजन्य माल हस्तगत करण्यात आला.

सदर प्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, गुन्ह्याचा तपास पोउपनिरीक्षक विनोद पाटील (युनिट-३, कल्याण) करत आहेत. आरोपीवर बीएनएस कलम १२३, २२४, २७४, २७५, ३(५) तसेच अन्न सुरक्षा व मानदे कायदा २००६ च्या विविध कलमानुसार कठोर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Mumbai Latest Crime News

ही कारवाई पोलीस उपायुक्त अमरसिंह जाधव (गुन्हे, ठाणे) आणि सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर बागडे (गुन्हे शोध-१) यांच्या मार्गदर्शनाखाली वपोनिरीक्षक अजित शिंदे, सपोनि सर्जेराव पाटील, पोउपनि विनोद पाटील, सपोउपनि दत्तराम भोसले, बालाजी शिंदे आणि त्यांचे पथक यांनी धडाडीने केली.

या कारवाईमुळे गुटखा माफियांचे थरकाप उडाले असून, “गुटखा बंदी फक्त कागदावर नाही, पोलिसांच्या कारवाईतून ती प्रत्यक्ष दिसते,” असा सूर नागरिकांतून उमटला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0