क्रीडा

“गुकेशचा घात!” – बुद्धिबळ सम्राट कार्लसनचा सिंहासनावरून घसरणारा क्षण

classical win in Norway Chess : भारतीय वंडरकिड गुकेश डीने क्लासिकल चेसमध्ये कार्लसनला पहिल्यांदा पराभूत करत इतिहास रचला

ANI :- शब्द थांबले, श्वास रोखले गेले, आणि अखेर चाल झाली – गुकेश डी India’s D Gukesh  याने बुद्धिबळाच्या रंगमंचावर इतिहास लिहिला. नॉर्वे चेस 2025 स्पर्धेच्या सहाव्या फेरीत, अवघ्या 19 वर्षांचा भारतीय बुद्धिबळपटू गुकेशने, जगातील सर्वात भीषण प्रतिस्पर्ध्यांपैकी एक, मॅग्नस कार्लसनला क्लासिकल टाइम कंट्रोलमध्ये पराभवाची चव चाखवली. classical win in Norway Chess

पराभवाने संतप्त झालेला कार्लसन बोर्डवरच फोडला ठोसा; नंतर गुकेशसमोर मान टाकत दिल्या शुभेच्छा

या पराभवाने कार्लसन इतका अस्वस्थ झाला की, त्याने चक्क चेस बोर्डवर घूंसा मारला! उपस्थित प्रेक्षक स्तब्ध झाले. मात्र कार्लसनला लवकरच आपल्या वर्तनाची जाणीव झाली आणि त्याने स्वतःहून पुढे येऊन गुकेशचे अभिनंदन करत माफीही मागितली.

गुकेशने या क्षणाला प्रगल्भतेने सामोरे जात कोणताही गाजावाजा न करता केवळ हस्तांदोलन करून आपली जागा घेतली. चेहऱ्यावर आश्चर्य आणि समाधानाचा संमिश्र भाव घेऊन तो काही क्षण मुका उभा राहिला — जणू त्यालाही विश्वास बसत नव्हता की त्याने खऱ्या अर्थाने “राजा”ला मात दिली आहे.

विशेष म्हणजे, पहिल्या फेरीत याच कार्लसनने गुकेशला पराभूत करून सोशल मीडियावर ‘राजाशी खेळताना चुका नकोत’ असं सूचक पोस्ट केलं होतं. पण यावेळी, गुकेशने संधीचा पुरेपूर फायदा घेत कार्लसनच्या एका चुकलेल्या चालीवर जबरदस्त काउंटर-अटॅक करत सामना आपल्या नावावर केला.

गुकेशच्या या ऐतिहासिक विजयामुळे संपूर्ण बुद्धिबळ विश्वात खळबळ माजली असून, भारतीय बुद्धिबळाचा नवोदित ‘राजा’ आता अधिक प्रगल्भ, आत्मविश्वासू आणि धोकादायक प्रतिस्पर्धी म्हणून उदयास आला आहे.

vivek

Recent Posts