क्राईम न्यूजपुणे

Wanwadi Police News : पोलिसांनी उघड केला गॅस चोरीचा ‘ब्लॅक मार्केट’! पुणे शहरात घरगुती सिलेंडरमधून गॅस चोरणारी टोळी जेरबंद

Pune Wanwadi Police Arrested Gas Cylinder Robbers : गणपती उत्सवाच्या तोंडावर ‘ब्लॅक’मध्ये गॅस विकणाऱ्या टोळीचा वानवडी पोलिसांनी केला पर्दाफाश!

पुणे :- शहराच्या गल्लीबोळात सुरू असलेल्या एका धक्कादायक गुन्हेगारीचा पर्दाफाश वानवडी पोलिसांनी Wanwadi Police केला आहे. घरगुती भारत गॅस सिलेंडरमधून अवैधरित्या गॅस चोरी करून तो ‘ब्लॅक मार्केट’मध्ये विकणाऱ्या एका टोळीला पोलिसांनी रंगेहाथ पकडले आहे. गणेशोत्सवाच्या तोंडावर केलेल्या या कारवाईमुळे नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या आरोपींना पोलिसांनी चांगलीच अद्दल घडवली आहे. Pune Latest Crime News

4 सप्टेंबर रोजी पोलिसांना एका टेम्पोमध्ये (क्र. एम.एच. 12 एल.टी. 2028) संशयास्पद हालचालींची माहिती मिळाली. हडपसर येथील सूर्यलोक नगरी सोसायटीजवळ हा टेम्पो उभा होता. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि पाहणी केली असता, त्यांच्या डोळ्यावर विश्वास बसला नाही. पंकज किसनसिंग ठाकूर (वय 20) आणि प्रवीण बंगालीराम कुमार (वय 35) हे दोघे एका सिलेंडरमधून दुसऱ्या सिलेंडरमध्ये गॅस ट्रान्सफर करत होते.

पोलिसांनी चौकशी केली असता, हे दोघे ‘समीधा भारत गॅस एजन्सी’चे कर्मचारी असल्याचे समोर आले. ते ग्राहकांना गॅस वितरित करताना प्रत्येक सिलेंडरमधून 1 किलो गॅस काढून दुसऱ्या टाकीत भरत होते. हे काम करण्यासाठी त्यांनी विशेष पद्धतीचा पाईप बनवला होता. हा ज्वलनशील पदार्थ अशा बेजबाबदार पद्धतीने हाताळणे म्हणजे नागरिकांच्या जीवाशी खेळण्यासारखे आहे, असे पोलिसांचे म्हणणे आहे.

पोलिसांनी या दोन्ही आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून 2 लाख 36 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.त्यांच्यावर वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे आणि त्यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.

पोलिसांनी सर्व नागरिकांना आवाहन केले आहे की, गॅस सिलेंडर घेताना तो व्यवस्थित तपासून घ्यावा आणि अशा संशयास्पद हालचाली आढळल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0