•पहाटेच्या शांततेत कोसळला 43 वर्षांपूर्वीचा जुना पूल; इको व्हॅन, ट्रक, ऑटो रिक्षा थेट नदीत
ANI | गुजरातमधील बडोद्याजवळील महिसागर नदीवर असलेला जुना पूल बुधवारी पहाटे अचानक कोसळल्यामुळे मोठी दुर्घटना घडली. या भीषण घटनेत 9 जणांचा मृत्यू, तर किमान 9 जणांना वाचवण्यात यश आलं आहे. दुर्घटनेनंतर नदीत अडकलेल्या वाहनांमधून बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.
ही दुर्घटना बडोद्याच्या पड्रा तालुक्यातील मुजपूर येथे घडली. पुलावरून जात असलेली इको व्हॅन, दोन ट्रक, पिकअप व्हॅन आणि एक ऑटो रिक्षा थेट महिसागर नदीत कोसळली. मिळालेल्या माहितीनुसार, नदीत कोसळलेला एक टँकर अर्धवट अडकलेला दिसतोय, तर पाण्यात बुडालेल्या वाहनामध्ये अडकलेला एक मुलगा आणि त्याच्या मदतीसाठी ओरडणारी त्याची आई – हे हृदयद्रावक दृश्य थरकाप उडवणारे ठरत आहे.
बडोद्याचे जिल्हाधिकारी अनिल धामेलिया यांनी घटनेबाबत माहिती देताना सांगितलं की, “सद्यस्थितीत 5 जण किरकोळ जखमी अवस्थेत वाचवण्यात आले आहेत. 2 मृत्यूंची आधीच पुष्टी झाली होती. नंतर आकडा 9 पर्यंत पोहोचला. ओळख अद्याप पूर्ण झाली नाही. बचावकार्य वेगात सुरू असून, एनडीआरएफ व अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आहेत.”
या घटनेतून एक धक्कादायक बाब समोर आली आहे की, हा पूल तब्बल 43 वर्षांपूर्वी बांधण्यात आला होता आणि केवळ गेल्या वर्षीच त्याची डागडुजी करण्यात आली होती. तरीही तो आज पहाटे कोसळला.
जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं की, “बचाव कार्य पूर्ण झाल्यानंतर पुलाची सखोल चौकशी केली जाईल. सध्या सर्वोच्च प्राधान्य मृतदेह बाहेर काढणे आणि जखमींना मदत करणे हेच आहे.”
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…