Gudi Padwa Wishes 2025 : पौराणिक कथांनुसार गुढीपाडव्याच्या दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टीची रचना केली होती. तसेच या दिवशी वसंत ऋतूचाही शुभारंभ होतो. हा सण नवा उत्साह आणि नवीन जीवनाच्या सुरुवातीचेही प्रतीक मानले जाते. हा उत्सव हिंदू धर्माची परंपरा, संस्कृती आणि शेतीचेही महत्त्व सांगतो.
Gudi Padawa Wishes 2025 : गुढीपाडवा…हिंदूंच्या नववर्षाची सुरूवात गुढीपाडव्यापासून होते. हिंदू कालदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच वसंत ऋतूच्या पहिल्या दिवसाला गुढीपाडवा साजरा केला जातो. शिशिराच्या पानगळ संपलेली असते, सरत्या वर्षाला निरोप द्यायचा आणि उगवत्या वर्षाचे स्वागत करायचं. मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात मराठी नवीन वर्षाचं स्वागत केलं जातं. यानिमित्ताने नातेवाईक, प्रियजन आणि मित्र परिवाला शुभेच्छा पाठवून त्यांचा आनंद अधिक द्विगुणीत करा. गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देण्यासाठी काही खास शुभेच्छा संदेश, मेसेज आणि स्टेटस Gudi Padawa Wishes Marathi 2025
पाडव्याची नवीन पहाट
घेवून येवो तुमच्या
जीवनात सुखाची लाट
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा !
जल्लोष नवं वर्षाचा
मराठी अस्मितेचा
हिंदू संस्कृतीचा
सण उत्साहाचा
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा !
वसंताची पहाट घेऊन आली,
नवचैतन्याचा गोडवा,
समृद्धीची गुढी उभारू,
आला चैत्र पाडवा..
गुढीपाडवा, नव वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !
गुढीपाडव्याचा सण तुमच्या आयुष्यात घेवून येवो
आनंद, भरभऱाट आणि उत्तम आरोग्य
गुढीपाडवा आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !
चंदनाच्या काठीवर,
शोभे सोन्याचा करा…
साखरेची गाठी आणि,
कडुलिंबाचा तुरा…
मंगलमय गुढी,
भरजरी खण,
स्नेहाने साजरा करा पाडव्याचा सण…
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
मराठी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा…!
गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्या नवीन वर्षाची सुरुवात होते. या दिवशी सकाळी घरोघरी गुढया उभ्या करून, तोरणे लावून नवीन वर्षाचे स्वागत केले जाते. आपली कालगणना हजारो वर्षे जुनी आहे. ती ग्रहांवर आधारित कालगणना पंचांगाच्या माध्यमातून आपल्याला कळते म्हणून संवत्सरारंभाच्या दिवशी गुढीबरोबर पंचांगावरील गणपतीचे पूजन करावयास सांगितले आहे. हा उत्सव घरोघरी करावयाचा असल्यामुळे आपण स्वतंत्रपणे राहत असल्यास आपल्या घरी ही पूजा करून गुढी उभी करण्यास काहीच हरकत नाही. त्याकरिता असे कोणतेच बंधनही नाही. त्यामुळे गुढीपूजन, पंचांगपूजन अवश्य करावे, अशी माहिती पंचांगकर्ते ओंकार मोहन दाते यांनी दिली.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…