क्राईम न्यूजठाणेमुंबई
Trending

Virar Crime Branch : पाच वर्षांपूर्वीच्या ‘खूनी’ महिलेला बेड्या; गळफास घेतल्याचा बनाव उघड

Virar Crime Branch Latest News : विरार गुन्हे शाखेची मोठी कारवाई; कांदिवलीतून फरार महिला आरोपीला अटक

विरार :- पाच वर्षांपूर्वी (2020 मध्ये) घडलेल्या एका खून प्रकरणात पुरावा नष्ट करून फरार झालेल्या महिला आरोपीला अखेर गुन्हे प्रकटीकरण शाखा, कक्ष-3 Virar Crime Branch Unit 3 विरारच्या पथकाने अटक केली आहे. आरोपी महिलेला पकडण्यात गुन्हे शाखेला चार महिन्यांच्या अथक परिश्रमानंतर यश आले आहे. Virar Latest Crime News

काय आहे नेमके प्रकरण?

ही घटना 12 फेब्रुवारी 2020 रोजी घडली होती. आरोपी महिलेने प्रदीप दयाशंकर राय (वय 23, रा. बदलापूर पूर्व) या तरुणाला जीवे मारले. त्यानंतर, मृत व्यक्तीने गळफास घेतल्याचा बनाव करून खुनाचा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणी अर्नाळा पोलीस ठाण्यात भा.दं.वि. कलम 302 (खून) आणि 201 (पुरावा नष्ट करणे) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्यातील फरार महिला आरोपी डॅलरीन आफरीन अहमद खान (वय 27, रा. नालासोपारा पश्चिम) हिच्याविरुद्ध तत्कालीन तपास अधिकाऱ्यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.

गुन्हे शाखेची कौशल्यपूर्ण कारवाई

पोलीस उप आयुक्तांच्या आदेशानुसार, जुन्या आणि गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपींचा शोध घेण्याची मोहीम गुन्हे प्रकटीकरण शाखा, कक्ष-3 विरारने हाती घेतली होती. पोलीस निरीक्षक शाहूराज रणवरे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी व अंमलदारांनी गेली चार महिने या आरोपीचा शोध घेतला.

सखोल आणि कौशल्यपूर्ण तपासानंतर फरार महिला आरोपी डॅलरीन आफरीन अहमद खान हिला दिनांक 10 ऑक्टोबर 2025 रोजी मुंबईतील कांदिवली पूर्व येथून ताब्यात घेण्यात आले. तिला पुढील कायदेशीर कारवाईसाठी अर्नाळा पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. या यशस्वी कामगिरीबद्दल पोलीस आयुक्त, अपर आयुक्त आणि इतर वरिष्ठांनी तपास पथकाचे कौतुक केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0