મુખ્ય સામગ્રી પર જાઓ

Mumbai News : कामाठीपुरा पुनर्विकासाला सर्वपक्षीय नेत्यांचा हिरवा कंदील! राजकारण बाजूला ठेवून प्रकल्पाला गती देण्याचा निर्धार

Mumbai News :अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि जपानी सल्लागारांच्या मदतीने पुनर्विकासाला नवी दिशा; ५०० चौरस फुटांपर्यंतची घरे पात्र लाभार्थ्यांना मिळणार

વિક્રાંત કુલકર્ણી
વિક્રાંત કુલકર્ણી

3 મિનિટ વાંચનઅપડેટ:

कामाठीपुरा पुनर्विकासाला सर्वपक्षीय नेत्यांचा हिरवा कंदील
राजकारण बाजूला ठेवून प्रकल्पाला गती देण्याचा निर्धार

मुबारक जिनेरी

Mumbai News : मुंबई, मुबारक जिनेरी : मुंबईतील ऐतिहासिक कामाठीपुरा परिसराच्या बहुप्रतीक्षित पुनर्विकास प्रकल्पाला आता गती मिळण्याचे संकेत मिळत आहेत. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी सर्वपक्षीय नेते एकत्र आले असून, स्थानिक पातळीवर कोणतेही राजकारण न करता पुनर्विकासाचे काम मार्गी लावण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. कामाठीपुरा येथे पुनर्विकास प्रकल्प कार्यालयाचे उद्घाटन खासदार मिलिंद देवरा, आमदार अमिन पटेल, शिवसेना नेते व खासदार अरविंद सावंत, म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जैस्वाल आणि मुख्याधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या उपस्थितीत करण्यात आले.या उद्घाटन कार्यक्रमप्रसंगी प्रकल्पाच्या विविध पैलूंवर चर्चा करण्यात आली. विशेषतः रहिवाशांना मिळणारा घरांचा लाभ, पुनर्विकासासाठी वापरण्यात येणारे अत्याधुनिक तंत्रज्ञान, जपानी सल्लागारांचे सहकार्य आणि प्रकल्पाच्या कायदेशीर प्रक्रियेला गती देण्याची गरज यावर मान्यवरांनी भर दिला.

५०० चौरस फुटांपर्यंतची घरे मिळणार : आ. अमिन पटेल

आमदार अमिन पटेल यांनी कामाठीपुरा पुनर्विकास प्रकल्पासाठी प्रयत्न करणाऱ्या विकास समितीचे कौतुक केले. या प्रकल्पामुळे पात्र लाभार्थ्यांना तब्बल ५०० चौरस फुटांपर्यंतची घरे मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. रहिवाशांच्या हिताचा विचार करून पुनर्विकासाची प्रक्रिया पुढे नेण्यात येत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

प्रकल्पाच्या उभारणीत अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार असून, जपानी सल्लागारांचे मार्गदर्शन आणि सहकार्यही लाभत आहे. त्यामुळे कामाठीपुरा पुनर्विकास केवळ इमारतींची पुनर्बांधणी न राहता आधुनिक सुविधांनीयुक्त असा नियोजनबद्ध प्रकल्प ठरण्याची अपेक्षा पटेल यांनी व्यक्त केली.

मुरली देवरा यांचे स्वप्न साकार होत असल्याची मिलिंद देवरा यांची भावना

खासदार मिलिंद देवरा यांनी भाषणादरम्यान भावनिक होत कामाठीपुरा पुनर्विकासाच्या ऐतिहासिक महत्त्वावर प्रकाश टाकला. त्यांचे वडील मुरली देवरा यांनी कामाठीपुराच्या विकासाचे जे स्वप्न पाहिले होते, ते आता प्रत्यक्षात साकार होत असल्याचे त्यांनी सांगितले.

या प्रकल्पाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी रहिवाशांनी सहकार्य करणे आवश्यक असल्याचे नमूद करत त्यांनी सर्व पात्र रहिवाशांना त्वरित आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन केले. कागदपत्रांची पूर्तता आणि कायदेशीर बाबी वेळेत पूर्ण झाल्यास पुनर्विकासाच्या पुढील टप्प्यांना गती मिळण्यास मदत होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

कमी नफ्यातील आव्हान स्वीकारल्याबद्दल विकासकांचे कौतुक

म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जैस्वाल यांनी प्रकल्पाच्या आर्थिक आणि प्रशासकीय बाजूंवर भाष्य केले. अत्यल्प नफ्याच्या मर्यादेत काम करावे लागत असल्याने अनेक विकासक अशा प्रकल्पासाठी पुढाकार घेत नाहीत. मात्र, विकासकांनी हे आव्हान स्वीकारल्याबद्दल त्यांनी त्यांचे विशेष कौतुक केले.

कामाठीपुराच्या पुनर्विकासासाठी विकास समितीच्या सदस्यांनी रहिवाशांना जास्तीत जास्त लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न केला असल्याचेही जैस्वाल यांनी सांगितले. आता प्रकल्प प्रत्यक्षात पूर्ण करण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया वेगाने पूर्ण करणे आवश्यक आहे. यासाठी विकास समिती, रहिवासी आणि संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याची गरजही त्यांनी अधोरेखित केली.

राजकारण बाजूला ठेवून पुनर्विकास पूर्ण करण्याचा निर्धार

कामाठीपुरा पुनर्विकास हा हजारो रहिवाशांच्या भविष्याशी संबंधित महत्त्वाचा विषय आहे. त्यामुळे या प्रकल्पात राजकीय मतभेद किंवा पक्षीय राजकारण आडवे येऊ दिले जाणार नाही, अशी भूमिका उपस्थित सर्वपक्षीय नेत्यांनी मांडली.

स्थानिक पातळीवर कोणतेही राजकारण न करता प्रकल्पाला गती देण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करण्याची ग्वाही यावेळी देण्यात आली. सर्वपक्षीय नेत्यांचा पाठिंबा, म्हाडाचे सहकार्य, विकास समितीचे प्रयत्न आणि रहिवाशांचा सहभाग यांच्या माध्यमातून कामाठीपुरा पुनर्विकासाचा मार्ग सुकर होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

कामाठीपुराच्या पुनर्विकासाचा पुढील प्रवास आता कायदेशीर प्रक्रिया किती वेगाने पूर्ण होते आणि संबंधित सर्व घटक किती प्रभावीपणे समन्वय साधतात, यावर अवलंबून असणार आहे.

https://epaper.maharashtramirror.com/

શેર કરો
વિક્રાંત કુલકર્ણી

News and Video editor

hey, i am vikrant kulkarni news and video editor of maharashtra mirror news paper