मुंबई
Trending

GST Council Meeting Latest News Today: जीएसटी कौन्सिलच्या बैठकीला महाराष्ट्राचे अर्थमंत्री अजित पवार अनुपस्थित, शरद पवार गटाने हे प्रश्न उपस्थित केले

GST Council Meeting Latest News Today:  देशाची राजधानी दिल्लीत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली GST परिषदेची बैठक सुरू झाली आहे. महाराष्ट्राचे अर्थमंत्री याला उपस्थित राहिले नाहीत.

मुंबई :- दिल्लीत जीएसटी कौन्सिलची बैठक GST Council Meetingआयोजित करण्यात आली असून त्यात महाराष्ट्राचे अर्थमंत्री अजित पवार उपस्थित न राहण्यावर शरद पवार गटाने प्रश्न उपस्थित केले आहेत. या बैठकीत अर्थमंत्र्यांशिवाय इतर कोणालाही बोलण्याचा अधिकार नाही, असे शरद पवार यांचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार)म्हणाले यातून जनतेत काय संदेश जाईल?

GST कौन्सिलच्या बैठकीबाबत NCP-SP च्या अधिकृत ‘X’ हँडलवर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. त्यात लिहिले आहे,वस्तू व सेवा कर परिषद अर्थात जीएसटी काऊंसिल बैठक ही प्रत्येक राज्याच्या विकासात्मक मार्गावरील महत्त्वाची अशी बैठक आहे. देशाचा सर्वाधिक जीएसटी हा महाराष्ट्रातून केंद्राला जातो. सद्यस्थितीत राज्यातील विविध प्रश्नांच्या सोडवणूकीसाठी आणि मुख्यत्वे राज्य सरकार ज्या नवनवीन योजना जाहीर करतंय त्यासाठी निधीचा तुटवडा जाणवतो आहे. या प्रश्नांवर मार्ग काढण्यासाठी आणि राज्याच्या हक्काचा जीएसटी परतावा मिळवण्यासाठी अर्थमंत्री या बैठकीला उपस्थित न राहणे कितपत योग्य आहे?

या परिषदेला अर्थमंत्र्यांशिवाय कोणालाही बोलण्याचा अधिकार नाही. केवळ हजेरी लावण्यासाठी सचिव किंवा इतर मंत्री बैठकीला उपस्थित राहू शकतात. असे असतानाही राज्याच्या अर्थमंत्र्यांच्या अपरोक्ष बालविकास विभागाचे मंत्री बैठकीला हजेरी लावतात. तसेच यापूर्वीही या बैठकीला प्रत्यक्षात उपस्थित न राहाता किंवा थेट गैरहजर राहून यातून अर्थमंत्र्यांना या प्रश्नांचे गांभीर्य कितपत राहीलंय याचा जनतेने काय बोध घ्यावा?

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0