मुंबई

Kalyan Crime News : खडकपाडा पोलिसांची मोठी कामगिरी ; 30 लाख 57 हजार 500 रुपये किमतीचा गुटखा जप्त

•टेम्पो मधून विमल पानमसाला, व्हि-1 टोबॅको, जर्दा, गुटखा, खडकपाडा पोलिसांनी केलं जप्त

कल्याण :- महाराष्ट्र राज्यात गुटखा बंदी असताना खडकपाडा पोलीस यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून सहाय्यक पोलीस निरीक्षक गायकवाड तपासे पोलीस शिपाई व्हटकर यांना दुर्गाडी परिसरात गुटख्याने भरलेला टेम्पो येणार असल्याचे पोलिसांना माहिती मिळाली. Kalyan Crime News

खडकपाडा पोलिसांनी छापा टाकत टेम्पोचे पाहणी केली असता त्यामध्ये तंबाखूजन्य पदार्थ असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले ज्याची किंमत 30 लाख 57 हजार 500 रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले असून हा माल बेकायदेशीर रित्या विक्रीसाठी आल्याचे पोलिसांनी सांगितले पोलिसांनी सरकार तर्फे दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी विरोधात भा.द.वि.कलम 328,188,272,273 सह अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 कलम 26(2)(i), 26(2)(iv), 27(1), 3(1)(zz)(i), 30(2)(अे) सह शिक्षा कलम 59(3) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून, या घटनेतील दोन आरोपी असून पोलिसांनी दोन्ही आरोपीला अटक केली आहे अटक केलेले आरोपीचे नाव मोहम्मद राजा मोनिस पठाण (26 वर्षे), विनोद गंगवाणी (26 वर्षे) हे दोन्ही आरोपी गुजरातच्या वापी राज्यातून आले असून या आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. पुढील चौकशी सहाय्यक पोलीस निरीक्षक गायकवाड हे करत आहे. Kalyan Crime News

vivek

Recent Posts

Rohit Pawar : रोहित पवारांना ‘सीएकओ’चा फोन! विमान अपघाताच्या वादात स्मारकाची चर्चा; बारामती पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…

4 hours ago