क्राईम न्यूज

Govandi Wanted Criminal : गोवंडी पोलिसांची ‘वॉन्टेड’ आरोपींवर सर्जिकल स्ट्राईक! ‘खुनाच्या प्रयत्ना’तील दोन सराईत फरारी अखेर गजाआड

Govandi Wanted Criminal Arrested : न्यायालयात हजर न राहिल्याने जारी झाले होते अजामीनपात्र वॉरंट; तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे दोघांनाही बेड्या

मुंबई, गोवंडी :- न्यायालयीन प्रक्रियेला फाटा देत सत्र न्यायालयाच्या सुनावणीस वारंवार दांडी मारणाऱ्या ‘खुनाच्या प्रयत्न’ (कलम 307) गुन्ह्यातील दोन वॉरंटेड आरोपींना गोवंडी पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली आहे. न्यायालयाकडून अजामीनपात्र वॉरंट (Non-Bailable Warrant) जारी झाल्यानंतर गोवंडी पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवली आणि या फरार आरोपींना जेरबंद केले.

गोवंडी पोलीस ठाणे अंतर्गत दाखल असलेल्या गंभीर गुन्ह्यातील हे दोन्ही आरोपी, कुणाल पांडुरंग कांबळे आणि विशाल राजू गायकवाड, जामिनावर असतानाही कोर्टात हजर राहत नव्हते.

वॉरंट प्राप्त होताच, वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ सावंत यांच्या मार्गदर्शनाखालील वॉरंट बजावणी पथकाने सहाय्यक फौजदार जायभाय, भडवळकर, पोलीस हवालदार बोराटे अत्यंत गुप्तपणे तपास सुरू केला. पथकाने तांत्रिक मदतीच्या आणि गुप्त बातमीदारांच्या माहितीच्या आधारे सापळा रचून या दोन्ही आरोपींना त्यांच्या राहत्या घरातूनच ताब्यात घेतले.अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींना तात्काळ न्यायालयासमोर हजर करण्यात आले असून, गोवंडी पोलिसांनी सराईत वॉरंटेड आरोपींना पकडून न्यायव्यवस्थेप्रती आपली तत्परता दाखवली आहे.

vivek

Recent Posts