Govandi Railway Accident: पोलिसांच्या सतर्कतेमुळे गोवंडी रेल्वे स्थानकात प्रवाशांचे प्राण वाचलं
Govandi Railway Police: गोवंडी ; लोकलमध्ये गर्दीमुळे रेल्वे प्रवाशाला पडताना पोलिसांच्या सतर्कतेमुळे वाचविले
मुंबई :- वाशी रेल्वे पोलिसांच्या Vashi Railway Police सतर्कतेमुळे रेल्वे प्रवाशाचे प्राण वाचले आहे. दिड दिवसाचे गणपती विसर्जन Ganpati Visarjan बंदोबस्त करता कर्तव्यवर असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक दराडे, आणि त्यांची टीम निमगिरे,मंजुषा देव असे गणपती बंदोबस्ताच्या अनुशंगाने गोवंडी रेल्वे स्टेशन फलाट क्रमांक-1/2 वर CSMT बाजूकडे गस्त करीत असताना सुमारे 7.30 वा. चे छत्रपती शिवाजी महाराज ते पनवेल येथे जाणारी लोकल ट्रेन गोवंडी रेल्वे स्टेशन Govandi Railway Accident येथे येत असताना एक रेल्वे प्रवासी अंदाजे 30 ते 35 वर्ष हा सदर लोकल ट्रेन मध्ये प्रवाशांच्या गर्दीमध्ये दरवाजात उभे राहून प्रवास करत असताना, चालू गाडीतून उतरत असताना फलाटावर घसरून पडला. व चालू लोकल ट्रेन आणि फ्लॅट फॉर्मच्या खाली जात असल्याचे दिसून आल्याने तात्काळ पोलीस सहाय्यक निरीक्षक दराडे,निमगिरे, मंजुषा देव असे तात्काळ सदर प्रवासी इसमास लोकल ट्रेन जवळून खेचून, बाजुला काढून त्याचा जीव वाचवला आहे. प्रवाशी यांना औषधोपचार बाबत विचारले असता त्यांना कुठलीही दुखापत झाली नसल्याचे सांगितले आहे.