क्राईम न्यूजठाणेमुंबई
Trending

Goregaon Murder News : रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या तरुणाला 3 तासांत न्याय! गोरेगावमध्ये थरार!

Goregaon Murder News : मोटारसायकलच्या चावीवरून वाद, पोटात चाकू खुपसला; *’वनराई पोलीस स्टेशन’च्या टीमने ‘हिरो’गिरी करत तिघांना आरे जंगलातून ठोकल्या बेड्या!

मुंबई (गोरेगाव) :– मुंबईतील गोरेगाव Mumbai Goregaon Crime News पूर्व परिसरात किरकोळ वादातून एका तरुणावर जीवघेणा हल्ला करत, त्याच्या पोटात धारदार शस्त्र खुपसणाऱ्या तीनही आरोपींना वनराई पोलिसांनी Vanrai Police Station अवघ्या तीन तासांत अटक करून एक गंभीर गुन्हा उघडकीस आणला आहे. पोलिसांच्या या शिस्तबद्ध आणि वेगवान कारवाईमुळे त्यांना सर्वत्र कौतुकाची थाप मिळत आहे. Goregaon Latest Crime News

काय घडले होते त्या रात्री?

दिनांक 22 नोव्हेंबर 2025 रोजी सायंकाळी 7.30 ते 8.00 वाजताच्या सुमारास आरे सिग्नल ब्रिजखाली ही घटना घडली. फिर्यादी जोयेब नईम बेग (वय 22) हा मोटारसायकलवर उभा असताना तीन अनोळखी इसमांनी त्याला अडवले. त्यांनी विनाकारण दादागिरी करत मोटारसायकलची चावी हिसकावून घेतली आणि वाद वाढवला. या वादातून एका आरोपीने त्याला जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने थेट धारदार शस्त्र फिर्यादीच्या पोटात खुपसले, त्याला गंभीर जखमी केले आणि तिघेही फरार झाले.

गोरेगाव स्टेशन ते आरे जंगल… तीन तासांत सूत्र हलले!

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन वनराई पोलीस ठाण्याच्या पथकाने तातडीने तपास सुरू केला. फरार झालेले दोन आरोपी गोरेगाव स्टेशन परिसराकडे पळाल्याची माहिती मिळताच, पोलिसांनी एका पथकाला पाठवले. पोलीस व्हॅन पाहून पळून जाणाऱ्या दोन अनोळखी इसमांना पोलिसांनी मोठ्या शिताफीने पाठलाग करून ताब्यात घेतले.

त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे आणि तांत्रिक व पारंपरिक तपास कौशल्याचा वापर करून, पोलिसांनी तिसऱ्या आरोपीला भवानीनगर, आरे जंगल परिसर, मुंबई येथे पाळत ठेऊन ताब्यात घेतले.

अटक आरोपी नईम शहाबुद्दीन धोबी यानेच फिर्यादीची मो/सायकलची चावी हिसकावून मोटारसायकल चोरी केली होती. पोलिसांनी चोरी केलेली सुझुकी मोटारसायकल तसेच आरोपीने गुन्ह्यात वापरलेला चाकू आरे जंगलातून हस्तगत केला आहे.

अटक आरोपी आणि यशस्वी पोलीस टीम

अटक आरोपींची नावे

1) नईम शहाबुद्दीन धोबी (वय 26)

2) समीर शहाबुद्दीन धोबी (वय 30)

3) विनोद कुमार वडिवेल पडियाची (वय 29).

यशस्वी कारवाई करणारे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी

ही यशस्वी कामगिरी पोलीस आयुक्त देवेन भारती, पोलीस सहआयुक्त सत्यनारायण चौधरी (का व सु), अपर पोलीस आयुक्त शशीकुमार मीना (उत्तर प्रादेशिक विभाग),पोलीस उप आयुक्त महेश चिमटे (परिमंडळ- 12) आणि संदीप जाधव (परिमंडळ-11) तसेच सहायक पोलिस आयुक्त विजय भिसे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

वनराई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीष बने यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुभाषचंद्र पोस्टुरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सतिश कदम, पोलीस उपनिरीक्षक इंद्रजित भिसे, रणजित वणवे, पोलीस उपनिरीक्षक बापूराव हराळ, रुक्मिणी माने, महिला पोलीस उपनिरीक्षक तेजल आहेर आणि कर्मचारी पोलीस हवालदार राणे, पोलीस हवालदार धनु,येवले, पोलीस शिपाई नवलू यांनी या गुन्ह्याचा छडा लावला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0