मुंबई

Goregaon Fire News : गोरेगावमध्ये पाच मजली इमारतीला भीषण आग; अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल

Goregaon Latest Fire News : इमारतीच्या मीटर बॉक्समध्ये आग लागल्याची शक्यता; बचावकार्य सुरू,आगीची तीव्रता वाढली, अद्याप कोणतीही जीवितहानी नाही

मुंबई :- मुंबईतील गोरेगाव येथे एस. व्ही. मार्गावरील एका पाच मजली इमारतीला आज, बुधवारी दुपारी 12.30 च्या सुमारास भीषण आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या असून, आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

सिंघी गणेश सोसायटीतील ‘शालिमार’ इमारतीत आग

गोरेगावमधील सिद्धी गणेश सोसायटीतील ‘शालिमार’ या पाच मजली इमारतीच्या मीटर बॉक्समध्ये ही आग लागल्याचे प्राथमिक माहितीमध्ये समोर आले आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. आगीची तीव्रता जास्त असल्याने अग्निशमन दलाने 12.25 च्या सुमारास ही आग ‘लेव्हल-1’ ची (भयानक स्वरूपाची) असल्याचे जाहीर केले.

बचावकार्य सुरू

आगीच्या घटनेनंतर परिसरात एकच गोंधळ उडाला. अग्निशमन दलासोबतच पोलीस, पालिका कर्मचारी आणि अदानी इलेक्ट्रिसिटीचे कर्मचारीही घटनास्थळी दाखल झाले आहेत. अद्याप या आगीत कोणीही जखमी झाल्याची माहिती नाही. मात्र, आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अत्याधुनिक उपकरणांचा वापर केला जात आहे, तरीही आगीचे स्वरूप वाढत असल्याने जवानांना अडचणी येत आहेत.

सध्या अग्निशमन दलाचे जवान आग विझवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत, जेणेकरून कोणत्याही प्रकारची जीवितहानी होणार नाही.

vivek

Recent Posts