मुंबई
Trending

Gondia Bus Accident : गोंदियात भीषण अपघात, दुचाकी वाचवण्यासाठी बस उलटली, 9 जणांचा मृत्यू!

Shivshahi Bus Accident In Gondia Claims 9 Lives, Many Injured : गोंदियात हा अपघात झाला. या अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्येक पीडित कुटुंबाला तातडीने 10 लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा केली आहे.

गोंदिया :- गोंदियात बसचा भीषण अपघात झाला आहे. Shivshahi Bus Accident In Gondia या अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला आहे. जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अपघातातील मृतांना 10 लाखांची तातडीची मदत जाहीर केली आहे.दुचाकी वाचवण्याच्या प्रयत्नात बसचे नियंत्रण सुटले, असे या घटनेमागील कारण सांगितले जात आहे.

गोंदिया-कोहमारा राज्य महामार्गावरील खजरी गावाजवळ दुचाकीला वाचवण्याच्या प्रयत्नात शिवशाही बसचे नियंत्रण सुटून उलटली. बस पलटी झाल्यावर काही लोक त्याखाली दबले गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.शुक्रवारी दुपारी बारा ते साडेबारा वाजेच्या दरम्यान झालेल्या अपघातानंतर घटनास्थळी एकच धावपळ उडाली.

अपघातात उलटलेली बस महाराष्ट्र मार्ग परिवहन महामंडळाची (MSRTC) होती. ही बस भंडारा येथून साकोली लाखनी मार्गे गोंदियाकडे जात होती. या बसचा क्रमांक MH 09 EM 1273 असा आहे.बस समोर वळण घेत असताना अचानक समोरून एक दुचाकी आली. दुचाकी चालकाला वाचवण्याच्या प्रयत्नात बस चालकाने वाहनाला कट मारल्याने बसचे नियंत्रण सुटून बस उलटली.

अपघाताच्या वेळी बसमध्ये 35 हून अधिक प्रवासी होते, त्यापैकी 9 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांचा आकडाही वाढू शकतो. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातानंतर बस चालकाने घटनास्थळावरून पळ काढला. प्रवाशांच्या माहितीवरून रुग्णवाहिका आणि पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले.अधिकाऱ्यांनी जखमींना गोंदियाच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात (केटीएस) उपचारासाठी दाखल केले. अपघात झालेल्या बसला उचलण्यासाठी क्रेनची मदत घेण्यात आली आणि ती तेथून काढण्यात आली.फरार चालकाला लवकरच अटक करण्यात येईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0
17:07