महाराष्ट्र

Gondhiya News : गोंदियात 50 हून अधिक जण आजारी, लग्न समारंभात जेवण खाल्ल्याने तब्येत बिघडली

•गोंदिया जिल्ह्यातील बबई गावात लग्न समारंभात जेवण खाल्ल्याने 50 हून अधिक लोक आजारी पडले. बाधितांवर उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर आहे.

ANI :- गोंदिया जिल्ह्यातील एका गावात एका लग्न समारंभात अन्न खाल्ल्याने लहान मुलांसह 50 हून अधिक लोक आजारी पडले आणि त्यातील काहींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. एका अधिकाऱ्याने रविवारी ही माहिती दिली.

अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, बाधितांवर ग्रामीण रुग्णालय, गोरेगाव तहसीलमधील प्राथमिक आरोग्य केंद्र आणि गोंदियातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बाधितांनी शनिवारी बबई गावात एका लग्न समारंभात जेवण केले होते.

गोरेगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.पी.के.पटले यांनी सांगितले की, शनिवारी संध्याकाळी गावकऱ्यांनी आपल्या मुलांना पोटदुखी, उलट्या, जुलाब आदी त्रासामुळे रुग्णालयात आणले होते. ते म्हणाले, “आम्ही लहान मुलांसह सर्व रुग्णांवर उपचार केले.रविवारी चार रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर इतरांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने बबई गावात वैद्यकीय शिबिर लावले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0