•ग्राहकांना दिलासा: सोन्याचे दर 3,000 तर चांदीचे दर 8,000 ने उतरले; बाजारात खरेदीसाठी उत्साह
जळगाव :- धनत्रयोदशीचा शुभ मुहूर्त जसजसा जवळ येत आहे, तसतशी ग्राहकांमध्ये सोनं (Gold) आणि चांदी (Silver) खरेदीसाठी मोठी उत्सुकता वाढत आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून सतत वाढणाऱ्या दरांमुळे ग्राहकांची चिंता वाढली होती. सोन्याचे दर 1.35 लाख प्रति तोळा (GST सह) दरापर्यंत पोहोचल्यामुळे अनेकांनी खरेदी थांबवली होती. पण, आज धनत्रयोदशीच्या अत्यंत शुभ दिवशी सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण झाल्यामुळे बाजारात खरेदीसाठी नवचैतन्य निर्माण झाले आहे.
जळगावमध्ये मोठी घसरण:
जळगावच्या मार्केटमध्ये धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सोन्याच्या दरात तीन हजार रुपयांची मोठी घसरण झाली आहे. सोन्याचे दर जीएसटीसह थेट 1.32 लाख प्रति तोळा या पातळीवर आले आहेत. याशिवाय, चांदीच्या दरातही मोठी घट झाली असून, चांदीचे दर आठ हजार रुपयांनी उतरले आहेत. चांदीचे दर 1.78 लाख प्रति किलोवरून 1.70 लाख प्रति किलोपर्यंत खाली आले आहेत, ज्यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव हे राज्यातील एक प्रमुख चांदीचे बाजारपेठ म्हणून ओळखले जाते आणि धनत्रयोदशीच्या निमित्ताने येथे मोठ्या प्रमाणात चांदी खरेदी केली जाते. आज खामगावच्या बाजारपेठेतही चांदीच्या दरात मोठी घट झाल्याचे दिसून आले. गेल्या आठवड्यात 1.90 लाख प्रति किलोपर्यंत गेलेले चांदीचे भाव आज जीएसटीसह प्रति किलो 1.72 लाख रुपयांपर्यंत खाली आले आहेत. दरातील या घसरणीमुळे खामगावसह जळगावमधील सराफा बाजारात ग्राहकांची गर्दी वाढली असून, खरेदीचा उत्साह वाढला आहे
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…