क्राईम न्यूज

Gjya Marne | धक्कादायक ! गजा मारणे सोबत पोलीसांची मटण पार्टी : पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी केले चौघांना निलंबित

  • पोलीस आयुक्तांची कठोर भूमिका

पुणे, दि. १४ मे, महाराष्ट्र मिरर : मुबारक जिनेरी

पुण्यातील कुप्रसिद्ध गुंड गजानन मारणे उर्फ गजा मारणे Gjya Marne याच्या सोबत मटण पार्टी करणे पोलिसांना चांगलेच भोवले आहे. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी ढाब्यावरील सीसीटीव्ही फुटेज पाहून थेट पोलीस अधिकाऱ्यासह चौघांविरुद्ध निलंबनाची कारवाई केली आहे. Pune Crime News

पुण्याहून सांगली कारागृहात गजा मारणे याला पोलीस बंदोबस्तात घेऊन जात असताना कणसे ढाब्यावर मटण पार्टी झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यानिमित्ताने पुन्हा पोलीस आणि गुन्हेगार यांच्यातील साटेलोटे चव्हाट्यावर आले आहे. या घटनेची गंभीर दखल घेत पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सहायक पोलिस निरीक्षक सुरज राजगुरु, पोलिस हवालदार महेश बामगुडे, सचिन मेमाणे, रमेश मेमाणे आणि पोलिस शिपाई राहुल परदेशी यांना निलंबित केले.

पोलीस संरक्षणात मारणे यास सांगलीला नेत असताना ‘कनसे ढाब्या’वर पोलिसांनी मटण पार्टी केली होती. याची माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना लागल्यानंतर त्यांनी सीसीटीव्ही पाहणी केली. यानंतर सगळा प्रकार समोर आला. गजा मारणेला भेटायला दोन फॉर्च्युनर आणि एक थार गाडीतून भेटायला आलेल्या तिघांवर देखील गुन्हा दाखल केला आहे. Pune Crime News

Maharashtra Mirror

Recent Posts

Rohit Pawar : रोहित पवारांना ‘सीएकओ’चा फोन! विमान अपघाताच्या वादात स्मारकाची चर्चा; बारामती पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…

30 minutes ago

मुंबई पालिकेचा ‘महा’बजेट: 80,952 कोटींचा विकास आराखडा! फेरीवाल्यांना आता ‘QR कोड’चे सुरक्षा कवच, तर अनधिकृत बांगलादेशींवर कठोर कारवाई

Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…

18 hours ago

मुंबईचा ‘महा’अर्थसंकल्प: 80,952 कोटींची विकासाची झेप! राखीव निधीतून 13 हजार कोटींचा अंतर्गत डोस, निवडणुकीनंतर पालिकेचा खजिना खुला

Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…

18 hours ago