Ghodbunder Road : घोडबंदर रोडवर अवजड वाहनांस प्रवेश बंदी

•ठाण्याच्या Ghodbunder Road जड व अवजड वाहनांची वाहतूक बंद करणार आहेत.
ठाणे :- Ghodbunder Road वरून पालघरच्या दिशेने जाणाऱ्या अवजड वाहनांसाठी आता घोडबंदर रोड वर प्रवेश बंदी असल्याचे निर्देश मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय यांनी लागू केले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने 24 मे ते 17 जून या कालावधीत घोडबंदर रोडवर गायमुख घाटात रस्ता दुरुस्तीचे काम करण्यात येणार असून त्यावेळेस घोडबंदर रोडवर जड व अवजड वाहनांची वाहतूक बंद करणारी आहे. जनतेची गैरसोय होऊ नये म्हणून जनतेच्या सोयीसाठी आणि वाहतूक नियंत्रण अधिसूचना जारी केले आहे.
जड अवजड वाहनांना खालील प्रमाणे प्रवेश बंद करण्यात येत आहे
प्रवेश बंद- १) राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 अहमदाबाद, गुजरात कडुन ठाणे, नवी मुंबई येथे जाणाऱ्या जड-अवजड वाहनांसाठी घोडबंदर रोड काजूपाडा, गायमुख मार्गे प्रतिबंध करण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग :- मनोर (टेन नाका) येथून डावे वळण घेवुन पोशेरी-पाली-वाडा नाका-शिरीष पाडा येथून अंबाडी, भिवंडी मार्गे इच्छित स्थळी जातील.
प्रवेश बंद- २) राष्ट्रीय महामार्ग क्र. 48- पालघर- वसई बाजूकडून येणा-या वाहनांना चिंचोटी नाक्यापासून वरसाचे बाजूकडे येण्यासाठी प्रवेश बंद.
पर्यायी मार्ग:- चिंचोटी मार्गे कामन खारबांच अंजूरफाटा, भिवंडी मार्गे इच्छित स्थळी जातील.
प्रवेश बंद ३) पश्चिम द्रुतगतीमार्ग मुंबई व काशिमीरा बाजूकडून घोडबंदर रोड, ठाणे करीता जाण्यासाठी प्रवेश बंद करण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग :- वाहने वर्सोवा ब्रिजवरुन सरळ राष्ट्रीय महामार्गावरुन चिंचोटी फाटा ते कामन अंजूर फाटा- भिवंडी मार्गे इच्छित स्थळी जातील.
हलके वाहनांसाठी गायमुख घाटात घोडबंदर ठाणे वाहिनीवर काम करताना काजूपाडा कडून ठाणेच्या दिशेने जाणाऱ्या हलक्या वाहनांची वाहतूक इंडियन पेट्रोलपंप जवळील कटमधून ठाणे- बरसावे वाहिनीवर रॉग साइडने येऊन पुढे निराकेंद्र समोरील कट मधून गायमुख वरुन इच्छित स्थळी जातील.
पोलीस वाहने, फायरब्रिगेड, रुणवाहिका, ऑक्सीजन याहून नेणारे वाहने व इतर अत्यावश्यक सेवेतील वाहने यांना लागू होणार नाही, सदरची याहतूक अधिसुचना ही काम पूर्ण होई पर्यंत अंमलात राहील