
Maharashtra Vidhan Sabha Independence Day Celebration : उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे आणि विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांची प्रमुख उपस्थिती
मुंबई :- भारताच्या 79 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त मुंबई येथील विधान भवन येथे आज ध्वजारोहण सोहळा उत्साहात पार पडला. विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे आणि विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांची प्रमुख उपस्थिती होती.



या सोहळ्याला महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे सचिव जितेंद्र भोळे, सचिव मेघना तळेकर, सचिव डॉ. विलास आठवले, सचिव शिवदर्शन साठ्ये यांच्यासह इतर अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून सर्वांनी देशासाठी बलिदान दिलेल्या स्वातंत्र्यसैनिकांना आदराने अभिवादन केले.


