Ghatkopar Building Fire Update News : घाटकोपर परिसरातील इमारतीला लागलेल्या आगीत 13 जण जखमी झाले असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि आग आटोक्यात आणली.
मुंबई :- घाटकोपर परिसरात एका इमारतीला आग Ghatkopar Building Fire News लागल्याचे वृत्त आहे. माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि आग आटोक्यात आणली.अग्निशमन दलाने सांगितले की, 90 हून अधिक लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. तर या घटनेत 13 जण जखमी झाले असून त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
रमाबाई आंबेडकर गृहनिर्माण संस्थेत ही आगीची घटना घडली. Shanti Sagar Building in Ghatkopar हर्ष अनिल भिसे, स्वीटी संदीप कदम, जान्हवी मिलिंद रायगावकर, प्रियंका काळे, जसिम सलीम सय्यद, ज्योती मिलिंद रायगावकर, फिरोझा इक्बाल शेख, लक्ष्मी लक्ष्मण कदम, लक्ष्मण रामभाऊ कदम, मानसी श्रीवास्तव, अक्षरा सचिन शाह, दाते आणि अमीर इक्बाल खान अशी जखमींची नावे आहेत.
एक दिवसापूर्वी मुलुंड परिसरात असलेल्या ओपल अपार्टमेंटच्या 9व्या मजल्यावर भीषण आग लागली होती. या अपघातात एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली होती.
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…
Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…
Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…