Mumbai Garba News : पावसाच्या थैमानानं उत्साहावर पाणी फेरलं असताना, सप्तमी, अष्टमी, नवमीसाठी वेळेची मर्यादा वाढवली
मुंबई :- यंदाच्या नवरात्रोत्सवात अनेक ठिकाणी पावसामुळे गरबा आणि दांडियाच्या आयोजनावर पाणी फेरले होते. त्यातच पहिले काही दिवस लाऊडस्पीकरची मर्यादा रात्री 10 वाजेपर्यंत असल्याने गरबाप्रेमींचा हिरमोड झाला होता. मात्र, आता मुंबईतील गरबा आयोजकांसाठी आणि उत्साही तरुणाईसाठी एक दिलासादायक बातमी आहे. नवरात्रीचे शेवटचे तीन दिवस, म्हणजे सप्तमी, अष्टमी आणि नवमीला गरब्याच्या ठिकाणी रात्री 12 वाजेपर्यंत लाऊडस्पीकर वापरण्यास परवानगी देण्यात आली आहे.Mumbai Breaking News
जिल्हाधिकाऱ्यांकडून आदेश जारी
मुंबई उपनगर जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या कार्यालयाकडून ध्वनिक्षेपक आणि ध्वनीवर्धक वापराबाबत हे आदेश जारी करण्यात आले आहेत. यानुसार, नवरात्रीतील सप्तमी (29 सप्टेंबर), अष्टमी (30 सप्टेंबर) आणि नवमी (1 ऑक्टोबर) या तीन दिवसांमध्ये सकाळी सहा वाजेपासून रात्री बारा वाजेपर्यंत धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी लाऊडस्पीकरचा वापर करता येणार आहे.
परवानगीसोबत कठोर अटी लागू
रात्री 12 वाजेपर्यंत गरबा, दांडियासाठी परवानगी देण्यात आली असली तरी, त्यासाठी जिल्हा प्रशासनाने काही अटी आणि बंधने घातली आहेत, ज्यांचे काटेकोर पालन करणे बंधनकारक असणार आहे.
महत्त्वाच्या अटी
1.परवानगी मिळालेल्या कालावधीत ध्वनी मर्यादांचे काटेकोर पालन करणे बंधनकारक असेल.
2.उच्च न्यायालयाने वेळोवेळी दिलेल्या मार्गदर्शक आदेशांचे पालन करणे आवश्यक आहे.
3.शासनाने घोषित केलेल्या शांतता क्षेत्रात ही परवानगी लागू होणार नाही.
4.ध्वनी प्रदूषण नियम, 2000 मधील नियम 3 व 4 चे पालन करणे आवश्यक राहील.
5.नियमांचे उल्लंघन झाल्यास, पर्यावरण संरक्षण कायदा, 1986 अंतर्गत कारवाई करण्याचा अधिकार ध्वनी प्राधिकरणाला असेल.
6.या आदेशाचे उल्लंघन झाल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे. त्यामुळे वेळेची मर्यादा वाढल्यामुळे गरब्याचा आनंद लुटताना नियम पाळणे आवश्यक आहे.
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…