
Mumbai Police At Ganpati Visarjan : पोलीस आयुक्त कार्यालयाकडून नियोजन; नागरिकांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन
मुंबई :-, 6 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने मुंबईत गणेश विसर्जन मिरवणुका निघणार आहेत. या मिरवणुकीदरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मुंबई पोलिसांनी अभूतपूर्व बंदोबस्त ठेवला आहे. तब्बल 17,558 पोलीस अंमलदारांसह जवळपास 6322 हजार पोलीस अधिकारी व कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत. Mumbai Police Latest News
सुरक्षेसाठी व्यापक नियोजन
पोलीस आयुक्त, मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलीस सह आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) यांच्या देखरेखीखाली या बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये 10 पोलीस आयुक्त,347 पोलीस उपायुक्त, 61 सहायक पोलीस आयुक्त यांच्यासह 2996 पोलीस अधिकारी आणि 17,558 पोलीस अंमलदार सहभागी आहेत.
याशिवाय, महत्त्वाच्या ठिकाणांवर सी.ए.पी.एफ. प्लाटून, एस.आर.पी.एफ. प्लाटून, जलद प्रतिसाद पथक (QRT), दंगल नियंत्रण पथक (Riot Control Team), डेल्टा, कॉम्बॅक्ट, ॲण्टी ड्रोन पथक आणि होमगार्ड्स यांनाही तैनात करण्यात आले आहे. वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी वाहतूक पोलिसांचेही विशेष नियोजन करण्यात आले आहे.
नागरिकांना आवाहन
मुंबई पोलिसांतर्फे नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान गर्दीच्या ठिकाणी संयम राखावा आणि पोलिसांना सहकार्य करावे. कोणतीही बेवारस वस्तू आढळल्यास तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी. सर्वांनी नियमांचे पालन करून गणेशोत्सव उत्साहाने आणि जल्लोषात साजरा करावा. कोणत्याही मदतीसाठी पोलीस हेल्पलाईन 100 किंवा 112 वर संपर्क साधण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.


