मुंबई

Ganpat Gaikwad : भाजपाचे माजी आमदार गणपत गायकवाड यांना जामीन नाकारला; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

•पोलिस ठाण्यात गोळीबार केल्याच्या प्रकरणी न्यायालयाने याचिका फेटाळली; कायद्याच्या अंमलबजावणीवर आक्षेप

मुंबई :- शिंदे गटाचे माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्यावर पोलीस ठाण्यात गोळीबार केल्याच्या प्रकरणी अटकेत असलेले भाजपचे माजी आमदार गणपत गायकवाड यांना मुंबई उच्च न्यायालयाने जामीन देण्यास नकार दिला आहे. गायकवाड यांच्यासह त्यांचे अंगरक्षक आणि दोन साथीदारांची जामीन याचिका न्यायालयाने फेटाळून लावली आहे.

न्यायालयाने आपल्या निकालात म्हटले आहे की, कायद्याची अंमलबजावणी होणे अपेक्षित असलेल्या पोलीस ठाण्यात जाणूनबुजून गोळीबार करणे हे अत्यंत गंभीर कृत्य आहे. अशा प्रकारच्या कृत्यांना सौम्यतेने पाहता येणार नाही. जर अशा व्यक्तींना जामीन दिला, तर ‘कायदा कमकुवत असून, अशा व्यक्ती कायद्यापेक्षा श्रेष्ठ आहेत,’ असा चुकीचा संदेश समाजात जाईल.

न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या एकलपीठाने म्हटले की, “पोलीस ठाणे ही युद्धभूमी नाही. लोकप्रतिनिधींनी शस्त्र घेऊन पोलीस ठाण्यात जाणे अपेक्षित नाही.” अशा कृत्यांमुळे समाजात लोकप्रतिनिधींबद्दल भीती आणि दहशतीचे वातावरण निर्माण होते. गायकवाड यांच्या पत्नी विद्यमान आमदार असल्याने ते साक्षीदारांवर दबाव आणण्याची शक्यताही न्यायालयाने व्यक्त केली.

संपूर्ण प्रकरण काय होते?

2 फेब्रुवारी 2024 रोजी उल्हासनगर येथील हिललाईन पोलीस ठाण्यात जमिनीच्या एका वादावरून गणपत गायकवाड आणि महेश गायकवाड तक्रार दाखल करण्यासाठी गेले होते. याचवेळी पोलीस निरीक्षकांच्या दालनात दोघांमध्ये वाद झाला. या वादातून गणपत गायकवाड यांनी बंदुकीतून महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला होता. या प्रकरणी पोलिसांनी गणपत गायकवाड आणि त्यांच्या तीन साथीदारांना अटक केली आहे. न्यायालयाने आता त्यांना जामीन नाकारल्याने या प्रकरणाला एक महत्त्वाचे वळण मिळाले आहे.

vivek

Recent Posts

Rohit Pawar : रोहित पवारांना ‘सीएकओ’चा फोन! विमान अपघाताच्या वादात स्मारकाची चर्चा; बारामती पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…

4 hours ago