Lonikalbhor Ganja
पुणे, दि. ११ सप्टेंबर, महाराष्ट्र मिरर
मुबारक जिनेरी
ड्रग्स मुक्त पुणे शहर करण्यासाठी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी अंमली पदार्थ विरोधी मोहीम उघडली आहे. गेल्या ८ दिवसांपासून शहरातील विविध भागात कारवाई होत आहे. आज लोणीकाळभोर येथून तब्बल ८ लाखांचा जप्त करण्यात गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथक-२ ला मोठे यश आले आहे. सदर कारवाई गुन्हे उपायुक्त निखिल पिंगळे, सपोआ राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक-२ वपोनि सुदर्शन गायकवाड व त्यांच्या पथकाने केली. Lonikalbhor Ganja
संशयित आरोपी १) सुमेर सादीक तांबोळी, वय २६ वर्षे, रा जयभवानी चौक, बुरडगल्ली, ता सांगोला, जि. सोलापुर, २) विकास बाळु बनसोडे, वय ३४ वर्षे, रा भिमनगर, सांगोला, सोलापुर यांना याप्रकरणी अटक करण्यात आली.
दि.१ रोजी येथील लोणी उरूळीकांचन रोडने शेल पेट्रोलपंप रोड लोणीकाळभोर पुणे येथे सार्वजनिक रोडवर सार्वजनिक ठिकाणी इसम नामे १) सुमेर सादीक तांबोळी, वय २६ वर्षे, रा जयभवानी चौक, बुरडगल्ली, ता सांगोला, जि. सोलापुर, २) विकास बाळु बनसोडे, वय ३४ वर्षे, रा भिमनगर, सांगोला, सोलापुर यांच्या ताब्यात एकुण १६,१७,४००/- रु.कि.चा ऐवज त्यामध्ये ७,७७,४००/- रू.कि.चा. ३८ किलो ८७० ग्रॅम गांजा हा अंमली पदार्थ, तसेच इतर ऎवज व अंमली पदार्थ संगणमताने, अनाधिकाराने, बेकायदेशिररित्या, विक्रीकरीता जवळ बाळगताना मिळुन आल्याने त्याचे विरुध्द लोणीकाळभोर पोलीस स्टेशन गु.र.नं.४४१/२०२४, एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ (क), २० (ब) (ii) (क), २९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
वरील नमुद कारवाई ही Pune Police पोलीस आयुक्त, अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त, रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे शैलेश बलकवडे, पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, निखील पिंगळे, सहा पोलीस आयुक्त, गुन्हे. २ राजेंद्र मुळीक यांचे मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक २. गुन्हे शाखा, पुणे शहर कडील पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, सहा. पोलीस निरीक्षक नितीनकुमार नाईक, पोलीस अंमलदार युवराज कांबळे, योगेश मांढरे, चेतन गायकवाड, संदिप जाधव, साहिल शेख, अझिम शेख, आझाद पाटील व दिनेश बास्टेवाड यांनी केली आहे.
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…
Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…
Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…
Pune Swargate Case : पुणे पोलिसांचा ऐतिहासिक तपास | अश्लील व्हिडिओची गुगल हिस्टरी आणि बसमधील…
Rohit Pawar On DGCA And Central Minster : व्हीएसआर कंपनीला वाचवण्यासाठी दिल्लीतून हालचाली? | 28…