•कल्याण रेल्वे स्थानकावर मोठी कारवाई; 21 किलो गांजासह तस्कर अटकेत
कल्याण | पुरी एक्स्प्रेसने मुंबईकडे गांजा घेऊन आलेल्या दोघा तस्करांना कल्याण रेल्वे स्थानकावर बुधवारी दुपारी पोलिसांनी रंगेहाथ पकडले. संयुक्त कारवाई करत कल्याण गुन्हे शाखा, लोहमार्ग पोलीस आणि रेल्वे सुरक्षा बलाच्या पथकाने या दोघांकडून तब्बल 21 किलो गांजा हस्तगत केला. या अंमली पदार्थाची किंमत 4.17 लाख रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
मेहताब आलम इरशाद आलम शेख (35 वय, मुंब्रा, ठाणे), लाल अहमद मोहम्मद अमीन कोटकी (27 वय, कलबुर्गी, कर्नाटक) दोघेही ओरिसाच्या संबलपूर जिल्ह्यातून पुरी एक्स्प्रेसने गांजा घेऊन आले होते. कल्याण स्थानकावर ते उतरून बाहेर पडत असताना त्यांच्या संशयास्पद हालचाली पोलिसांच्या लक्षात आल्या. फलाट क्रमांक 5 वर गस्त घालणाऱ्या पथकाने दोघांना अडवले. पिशव्यांची झडती घेतली असता त्यात 21 किलो गांजा आढळला. तेथूनच त्यांना अटक करण्यात आली.
पोलिसी चौकशीत आरोपींनी ही तस्करी पहिल्यांदाच करत असल्याचे नाकारले असून, त्यांनी याआधीही गांजा विक्री केली असल्याची कबुली दिली. या दोघांमुळे अंमली पदार्थांच्या मोठ्या टोळीचा पर्दाफाश होण्याची शक्यता आहे.
ही धडक कारवाई पोलीस निरीक्षक विजय खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रोहित सावंत, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणपत सुळे, तसेच रेल्वे सुरक्षा बलाचे जवान आणि गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने केली. त्यांच्या या यशस्वी कारवाईमुळे कल्याण परिसरात अंमली पदार्थ तस्करी करणाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…