Gangster Dk Rav : रवी मल्लेश बोरा उर्फ दिलीप बोरा ते कुख्यात गॅंगस्टार छोटा राजनचा हस्तक डी के राव गुन्हेगारी प्रवास

Gangster Dk Rav : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याचा कट्टर शत्रू म्हणून ओळख असलेला डिके राव माटुंग्याच्या चाळीतून अंडरवर्ल्ड क्षेत्रात एक मोठे नाव
मुंबई :- मुंबईतील कुख्यात अंडरवर्ल्ड गँगस्टर डीके राव, जो दाऊद इब्राहिमचा कट्टर शत्रू होता. Gangster DK Rav डीके राव हे 90 च्या दशकातील मुंबईचे प्रसिद्ध गँगस्टर होते आणि त्यांनी छोटा राजनसोबत Choota Rajan अनेक वर्षे काम केले होते. खुनासह अनेक घटनांमध्ये त्याचे नाव पुढे आले होते.मुंबईतील माटुंगा येथे जन्मलेल्या डीके राव यांचे बालपण झोपडपट्टीत गेले. कुटुंबाची परिस्थितीही आर्थिकदृष्ट्या अत्यंत हलाखीची होती. तो थोडा मोठा झाल्यावर तो अशा लोकांशी जोडला गेला की तो चोरी, दरोड्यात गुंतला. यानंतर तो छोटा राजनच्या टोळीत सामील झाला.
80चे दशक उलटत असताना मुंबईत गँगस्टर डीके रावची भीतीही वाढत होती. छोटा राजनसोबत काम करताना डीके राव अपहरण, खंडणी, आदी कारवायांमध्ये सामील होता. छोटा राजनच्या सांगण्यावरून तो बिल्डरांकडून पैसे उकळायचा आणि पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकीही देत असे.या काळात त्याने अनेक बँकांमध्ये दरोडे टाकले आणि बड्या उद्योगपतींच्या खुनातही त्याचे नाव पुढे आले. हळूहळू तो छोटा राजनचा उजवा हात म्हणून ओळखला जाऊ लागला.
1991-92 मध्ये डीके राव आणि पोलिसांमध्ये चकमक झाली पण ते फरार झाले. यानंतर 1993 मध्ये मुंबई बॉम्बस्फोटानंतर छोटा राजन दाऊदपासून वेगळा झाला. त्यानंतर डीके रावही छोटा राजनसोबत आले. या काळात छोटा शकीलने त्याला दाऊदसोबत येण्याची अनेकवेळा ऑफर दिली पण तो छोटा राजनसोबतच राहिला असे सांगितले जाते.
दाऊदपासून विभक्त झाल्यानंतर तो अनेकवेळा पोलिसांच्या निशाण्यावर आला आणि चकमकीही झाल्या. असे म्हटले जाते की डीके राव आणि पोलिस यांच्यात तीन चकमकी झाल्या, त्यापैकी दोन वेळा तो थोडक्यात बचावला. त्याला चकमकीत सात गोळ्या लागल्या पण तरीही तो बचावला. डीके राव यांच्यावर खून, खुनाचा प्रयत्न अशा अनेक गंभीर गुन्ह्याखाली सुमारे 30 गुन्हे दाखल आहेत.
अनेक वर्षे त्याच्यासोबत काम करणाऱ्या छोटा राजनला पकडून भारतात आणल्यानंतर त्याने स्वतःची टोळी तयार केली. 2013 साली प्रसिद्ध अजय गोसालिया गोळीबार प्रकरणातही डीके राव यांचे नाव पुढे आले होते.यानंतर, त्याला एका खुनाच्या गुन्ह्यात अटक करून तुरुंगात गेले, परंतु जुलै 2016 मध्ये त्याची सुटका झाली. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर डीके पुन्हा टोळीकडे आठवडा मागू लागला.
दरम्यान, ऑक्टोबर 2017 मध्ये त्याने अँटॉपहिल येथील एका बिल्डरकडे 50 लाख रुपयांची खंडणी मागितली. ज्यामध्ये बिल्डरने पोलिसात तक्रार केली होती. अशा स्थितीत या माफियाला अटक करून तुरुंगात पाठवण्यात आले.हा बिल्डर झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पांतर्गत काम करत होता आणि डीके राव यांनी त्याला काम थांबवण्यास सांगितले होते आणि 50 लाख रुपयांची खंडणीही मागितली होती.
डी. के. राव याच्यावर सत्र न्यायालयाच्या परिसरातच हल्ला झाला आहे. राव आणि त्याचा साथीदार अनिल पाटील यांच्यात बाचाबाची झाली त्यानंतर त्याचे रूपांतर हाणामारीत झालं. अखेर पाटीलच्या तावडीतून वाचण्यासाठी रावनं तेथून पळ काढत न्यायाधीशांकडे धाव घेतली होती.
डी. के. राव याचे खंडणी, हत्येचा प्रयत्न आणि खून अशा एकूण 30 गंभीर गुन्ह्यांमध्ये नाव आहे. त्यातील अनेक प्रकरणांत त्याची सुटका झाली आहे. दोनदा तो मृत्यूच्या दारातून परतला आहे. खंडणीच्या गुन्ह्याखाली त्याला 2018 मध्ये शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली होती. ‘मकोका’ कोर्टात या प्रकरणी सुनावणी सुरू होती