मुंबई

Ganeshotsav 2025 : गणेशोत्सव मंडळांसाठी ‘आपत्ती प्रशिक्षण’ मोहीम,आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी बीएमसीचा पुढाकार

प्रत्येक मंडळातील दोन स्वयंसेवकांना मिळणार खास प्रशिक्षण

मुंबई | मुंबईत येत्या 27 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर, उत्सव काळात कोणतीही आपत्ती उद्भवू नये, यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांतील स्वयंसेवकांसाठी विशेष प्रशिक्षणाची योजना आखली आहे. या उपक्रमात प्रत्येक मंडळातील दोन स्वयंसेवकांना एकदिवसीय प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

मुंबईत सुमारे दहा हजारांहून अधिक सार्वजनिक मंडळांद्वारे गणेशोत्सव साजरा केला जातो. लाखो भाविक आणि पर्यटक या उत्सवासाठी शहरात दाखल होतात. त्यामुळे गर्दी, वाहतूक, अपघात, आगीच्या घटना किंवा आरोग्याशी संबंधित आपत्तीजन्य परिस्थिती उद्भवण्याचा धोका असतो. अशा वेळी स्वयंसेवकांनी सज्ज असणं आवश्यक ठरतं. यासाठी बीएमसीकडून ‘आपत्ती म्हणजे काय’, धोक्याची ओळख, प्राथमिक उपचार, गर्दी नियंत्रण, अग्निशमन प्रात्यक्षिके यांसारख्या गोष्टींचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.

या प्रशिक्षण कार्यक्रमात मुंबई महापालिकेचे अधिकारी, अग्निशमन दल, पोलीस विभाग, पालिका रुग्णालयांचे वैद्यकीय अधिकारी, तसेच वीज आणि वाहतूक विभागाचे तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. विभागीय कार्यालयांकडून प्राप्त झालेल्या मंडळांच्या यादीनुसार समन्वय साधला जात असून, राजेंद्र लोखंडे आणि विकास कांबळे या अधिकाऱ्यांची या उपक्रमासाठी विशेष समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

मुंबईचा गणेशोत्सव केवळ धार्मिक नाही, तर सामाजिक आणि सांस्कृतिक अस्मितेचा उत्सव आहे. त्यामुळे तो अधिक सुरक्षित आणि नियोजनबद्ध होण्यासाठी ही प्रशिक्षण मोहीम महत्त्वपूर्ण पाऊल ठरत आहे.

vivek

Recent Posts

मुंबई पालिकेचा ‘महा’बजेट: 80,952 कोटींचा विकास आराखडा! फेरीवाल्यांना आता ‘QR कोड’चे सुरक्षा कवच, तर अनधिकृत बांगलादेशींवर कठोर कारवाई

Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…

16 hours ago

मुंबईचा ‘महा’अर्थसंकल्प: 80,952 कोटींची विकासाची झेप! राखीव निधीतून 13 हजार कोटींचा अंतर्गत डोस, निवडणुकीनंतर पालिकेचा खजिना खुला

Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…

16 hours ago

Supriya Sule : राज्यसभेचा ‘पेच’ सुटणार? शरद पवारांच्या उमेदवारीसाठी सुप्रिया सुळेंचे ‘दिल्ली मिशन’; तर ठाकरेंच्या शिवसेनेचाही जागेवर दावा

•पुढील दोन दिवस पवारांची प्रकृती तपासणी | सुप्रिया सुळे काँग्रेस श्रेष्ठींना भेटणार | 'आदित्य' हट्ट…

21 hours ago