Uncategorized

 Ganesh Chaturthi 2024 : लालबागचा राजा, मुंबईतील ‘ही’ सात गणेश मंडळं जगभर प्रसिद्ध

 Ganesh Chaturthi 2024 : मुंबईत ही सात मंडळे गणेशोत्सवाच्या काळात भाविकांनी गजबजलेली असतात, लालबागचा राजा, गणेश गल्ली…

मुंबई :- गणेश चतुर्थी Ganesh Chaturthi 2024 हा भारतीयांचा एक प्रमुख सण आहे. यंदा ७ सप्टेंबरला म्हणजेच आज गणेश चतुर्थी साजरी होत आहे. आज देशभरातील घराघरात आणि मंडळांमध्ये गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना होणार आहे. देशभरात 11 दिवस गणेश उत्सव सुरू राहणार असून अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपतीच्या मूर्तीचे विसर्जन करून निरोप दिला जाणार आहे.देशभरात गणेशोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. पण, महाराष्ट्रात या उत्सवाचे सौंदर्य वेगळे आहे. यानिमित्ताने महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये भव्य गणपती उत्सवाचे आयोजन केले जाते. या उत्सवाची तयारी उत्सवाच्या अनेक दिवस आधीपासून सुरू होते. गणपतीचे भव्य आणि आगळेवेगळे रूप पाहण्यासाठी लोक दूरवरून महाराष्ट्रात येतात.आज आपण मुंबईतील प्रसिद्ध अशा गणेश मंडळांबद्दल जाणून घेऊयात.

  • मुंबईतील लालबागचा राजा हे मंडळ 1934 पासून अविरतपणे लालबाग मार्केट, जीडी गोएंका रोड, मुंबई येथे भव्य बाप्पाच्या मूर्तीची प्रतिष्ठापणा करते.
  • चिंचपोकळी चा चिंतामणी’ या नावाने प्रसिद्ध असलेले हे मंडळ 1920 सालापासून या गणपतीची स्थापना करत आहेत.
  • गिरगाव चा राजा’ या गणपतीची स्थापना 1928 सालापासून केली जाते. मुंबईतील गिरगाव येथील एस.व्ही.सोवनी मार्ग येथील हे मंडळ अतिशय प्रसिद्ध आहे.
  • GSB गणपती 1955 पासून कटक रोड, वडाळा, मुंबई येथील द्वारकानाथ भवन येथे भव्य गणपती उत्सव आयोजित केला जातो. हा गणेशोत्सव जीएसबी सेवा मंडळाकडून आयोजित केला जातो. ‘गोल्ड गणेश’ या नावानेही येथील बाप्पा प्रसिद्ध आहे.
  • खेतवाडीचा राजा’ नावाचे मंडळ 1959 पासून दरवर्षी मुंबईतील ग्रँट रोड, खंबाळा गल्लीमध्ये गणपती उत्सव साजरा करत असते. या मंडळाचे वैशिष्ठ्य म्हणजे येथील बाप्पााच्या मूर्तीचा आकार 1959 पासून एकसारखाच ठेवला जातो.
  • मुंबईतील अंधेरी पश्चिम येथे ‘अंधेरीचा राजा’ नावाचे गणेश मंडळ हा गणपती उत्सव आयोजित करते. येथे 1966 पासून गणपती मूर्तीची स्थापना केली जाते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0