Ganesh Chaturthi 2024 : वर्षावरील गणरायाचे दर्शनाकरिता परदेशी पाहुणे
Ganesh Chaturthi 2024: जगभरातील विविध देशांचे राजदूत आणि परराष्ट्र व्यवहार अधिकारी यांच्या हस्ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा बंगल्यावर गणरायाची आरती
मुंबई :- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे CM Eknath Shinde यांच्या शासकीय निवासस्थानी जगभरातील विविध देशाचे राजदूत आणि परराष्ट्र व्यवहार अधिकारी यांनी गणरायाचे दर्शन Ganesh Chaturthi घेतले. तसेच, आरती यांच्या हस्ते करण्यात आली असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्यासाठी खास एक मराठमोळी मेजवानी आयोजित केली होती.
यात श्रीलंका, मॉरिशस, स्वीडन, स्वित्झर्लंड, यूएई, अमेरिका, येमेन, दक्षिण कोरिया, चिली, चायना, मेक्सिको, जर्मनी, इंडोनेशिया, इराक, इराण, आयर्लंड, इटली, अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, बहारिन, बेलारूस या देशांच्या भारतीय राजदूतांचा समावेश होता. या सर्व राजदूतांचे उपस्थित राहून आगत्याने स्वागत केले. तसेच त्यांना खास भेट देऊन सन्मानीतही केले.
या पाहुण्यांसाठी खास पारंपारिक मराठमोळी मेजवानी आयोजित करण्यात आली होती. विविध देशांच्या या राजदूतांनी मोठ्या उत्साहात गणेशोत्सवाचा आनंद घेतला. तसेच श्री गणरायाचा आवडता नैवेद्य असलेल्या उकडीच्या मोदकांचा आस्वादही घेतला.
आसाम राज्याचे मुख्यमंत्री डॉ.हिमंत बिश्व शर्मा यांनी वर्षा या निवासस्थानी उपस्थित राहून विराजमान झालेल्या श्री गणेशाचे दर्शन घेतले. त्यांनीही थेट आसामवरून आणलेले उपरणे आणि भेटवस्तू देऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सन्मान केला.
आसाम राज्याचे मुख्यमंत्री डॉ.हिमंत बिश्व शर्मा यांनी वर्षा या निवासस्थानी उपस्थित राहून विराजमान झालेल्या श्री गणेशाचे दर्शन घेतले. त्यांनीही थेट आसामवरून आणलेले उपरणे आणि भेटवस्तू देऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सन्मान केला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शासकीय निवासस्थानी गणरायाची स्थापना झाली असून या गणरायाच्या दर्शनाकरिता राज्यातून आणि देशातून प्रमुख नेते कलावंत दर्शनाकरिता येत असतात. केंद्रीय मंत्री अमित शहा यांनीही मुख्यमंत्री शिंदे यांच्या शासकीय निवासस्थानी भेट देऊन गणरायाचे दर्शन घेतले होते. तसेच, पोलीस बांधव शासकीय कर्मचारी सफाई कामगारांच्या हस्ते मुख्यमंत्र्यांनी गणरायाची आरती केली होती.