Gandhi Jayanti Special 2024 : गांधी जयंती हा महात्मा गांधी यांचा जन्मदिवस असून 2 ऑक्टोबर रोजी हा उत्सव भारतासह जगभरात साजरा केला जातो. गांधी जयंती ही भारताच्या तीन राष्ट्रीय दिनांपैकी एक आहे. या दिवशी भारतात सार्वजनिक सुट्टी असते. संयुक्त राष्ट्रसंघाने हा दिवस आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस म्हणून स्वीकारला आहे.
महात्मा गांधी म्हणजेच मोहनदास करमचंद गांधी यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 रोजी गुजरात मधील पोरबंदर येथे झाला. भारतीय जनमानसावर महात्मा गांधी यांच्या सत्य आणि अहिंसा या तत्त्वांचा प्रभाव आहे. भारताचे राष्ट्रपिता म्हणून त्यांचा गौरव केला जातो.त्यामुळे त्यांची जयंती भारतात साजरी केली जाते.
आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन
आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस हा जागतिक विशेष दिवस आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा जन्मदिवस 2 ऑक्टोबर रोजी गांधी जयंती म्हणून साजरा केला जातो. हाच दिवस संयुक्त राष्ट्रसंघ यांनी जागतिक अहिंसा दिवस म्हणून घोषित केलेला आहे. 2 ऑक्टोबर हा दिवस आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस म्हणून साजरा करावा अशी घोषणा संयुक्त राष्ट्रसंघाने 2007 साली केली. महात्मा गांधी यांनी दिलेला अहिंसेचा संदेश आणि त्याचे आचरण याचे महत्त्व अधोरेखित व्हावे असा यामागे हेतू आहे. Gandhi Jayanti Special 2024
भारतीय चलन आणि महात्मा गांधी
भारतीय चलन आणि महात्मा गांधी ही भारतीय अर्थव्यवस्थेतील एक महत्त्वाची संकल्पना आहे.भारतीय अर्थव्यवस्थेत विनिमयाचे साधन म्हणून नाणी आणि नोटा यांचा प्रामुख्याने वापर केला जातो. भारतीय चलनाच्या कागदी नोटांवर महात्मा गांधी यांचे चित्र छापलेले असते. महात्मा गांधी हे भारताचे राष्ट्रपिता म्हणून गौरविले जात असल्याने अर्थव्यवस्थेतील विनिमय प्रक्रियेत त्यांच्याबद्दलचा आदर दिसून येतो. Gandhi Jayanti Special 2024
भारतीय नोटांवर इसवी सन 1969 मध्ये सर्वप्रथम महात्मा गांधी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांचे छायाचित्र प्रथम छापण्यात आले. या नोटांवर महात्मा गांधी बसलेल्या अवस्थेत आणि त्यांच्या मागे सेवाग्राम आश्रम असे चित्र छापण्यात आले.1996 साली सुरक्षिततेच्या कारणास्तव खास वैशिष्ट्ये असलेल्या नव्या नोटा छापण्यात आल्या, ज्यामध्ये चलनातील सर्व नोटांवर गांधीजींचे छायाचित्र छापण्यात आले. हे छायाचित्र म्हणजे गांधीजींचे स्मितहास्य असलेला त्यांचा चेहरा आहे. 1946 मध्ये त्या काळातील ब्रिटिश अधिकारी फ्रेडरिक लॉरेन्स यांच्यासह काढलेल्या छायाचित्रातील केवळ चेहरा नोटांवर छापण्यात आला आहे. Gandhi Jayanti Special 2024