Gajanan Kirtikar On Pravin Darekar : शिंदे गटाचे नेते खासदार गजानन कीर्तिकर यांचे भाजपाचे आमदार प्रवीण दरेकर यांना प्रत्युत्तर
•Gajanan Kirtikar On Pravin Darekar भाजपा नेत्यांचे कटकारस्थानी आहेत, कट करणे हे माझ्या रक्तात नाही, भाजपाची सवयी ; गजानन कीर्तिकर
मुंबई :- गजानन कीर्तिकरांचे महायुती, शिंदेसेनेवर टीकास्त्र सुरूच राहिले. शिंदेसेनेचे नेते शिशिर शिंदे यांनी कीर्तिकरांची हकालपट्टी करावी, अशी मागणी केली. त्यावर ते म्हणाले की, उत्तर उद्धवसेनेतर्फे लढणारा माझा मुलगा अमोल जिंकला तर वडील म्हणून मला आनंद होईल. पण त्याच्याविरुद्धचा शिंदेसेनेचा उमेदवार रवींद्र वायकर जिंकला काय अन् हरला काय, त्यात माझा काय दोष? मी शेवटपर्यंत एकनाथ शिंदेंना साथ देईन. शिशिर शिंदेंनी त्यांची भावना मांडली. तो एक ध्येयवादी शिवसैनिक आहे, तसाच तो संवेदनशीलही आहे.भाजपचे नेतेच कटकारस्थानी असून दुसऱ्यावर आरोप करतात. त्यामुळे त्यांची डोकी तशीच चालतात. कट करणे हे माझ्या रक्तात नाही. कटकारस्थान करणे मला जमत नाही, ती सवय भाजपची आहे, असे म्हणत शिंदे गटाचे खासदार गजानन कीर्तीकर यांनी भाजप आमदार प्रवीण दरेकर यांना प्रत्युत्तर दिले आहे.खासदार गजानन कीर्तीकर पुढे बोलताना म्हटले की, अमोलने निवडणूक लढविणार असल्याचे आधीच जाहीर केले होते व तो शिंदे गटाकडून लढण्यास तयार नव्हता. माझे निवृत्तीचे वय झाल्याने व मुलाविरोधात लढणे उचित नसल्याने मीही लढणार नसल्याचे आधीच जाहीर केले होते, असे एका वृत्तपत्राशी बोलताना त्यांनी म्हटले आहे.
भाजप आमदार प्रवीण दरेकर नेमके काय म्हणाले?
प्रवीण दरेकर म्हणाले की, कीर्तिकर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिंदेसेनेत आहेत. मात्र, त्यांचा मुलगा उद्धवसेनेत आहे. उत्तर पश्चिम मुंबईतून स्वतःसाठी शिंदेसेनेची उमेदवारी मिळवायची आणि ऐनवेळी अर्ज मागे घेऊन अमोल यांना बिनविरोध खासदार करण्याचा गजानन कीर्तिकरांचा कट होता. मुख्यमंत्र्यांनी कीर्तिकरांच्या ज्येष्ठत्वाचा नेहमीच मान राखला. त्यांना ज्येष्ठतेची वागणूक दिली. पण कीर्तिकरांचा उद्देशच संशयास्पद होता. ते आता हळूहळू बाहेर येताना दिसत आहे.शिंदेसेनेचे नेते शिशिर शिंदे यांनी बुधवारी एकनाथ शिंदेंना पत्र पाठवून गजानन कीर्तिकरांवर हकालपट्टीच्या कारवाईची मागणी केली. मतदानाच्या दिवशी गजानन कीर्तिकर अमोल यांच्याच गाडीत होते. त्यांनी अमोलला मदत केली, असा आरोप शिशिर यांनी केला आहे. सूत्रांनी सांगितले की, या पत्राची दखल घेऊन कारवाई होण्याचे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.