Gajanan Kale Reply Sanjay Raut : संजय राऊत यांच्या टीकेला मनसेचे नेते गजानन काळे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. अबू आझमीला कडेवर….
मुंबई :- राज ठाकरे Raj Thackeray महाराष्ट्रद्रोह्यांच्या मांडीला मांडी लावून बसले आहेत. काही पक्षांची दखल घ्यावी अशी परिस्थिती महाराष्ट्रात नाही असे म्हणत उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत Sanjay Raut यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. संजय राऊत यांच्या टीकेला मनसेचे नेते गजानन काळे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. अबू आझमीला कडेवर घेऊन नाचत आहेत याला महाराष्ट्रद्रोह म्हणत नाही का ? असा सवाल गजानन काळे यांनी उपस्थित केला आहे.
मनसेचे नेते गजानन काळे खासदार संजय राऊत यांच्यावर टीका
या संदर्भात एका पोस्टच्या माध्यमातून मनसेचे नेते गजानन काळे यांनी उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. आपल्या पोस्टमध्ये गजानन काळे यांनी म्हटले की,2014 पासून 2019 पर्यंत मोदींच्या आणि भाजपच्या – मांडीवर कडेवर बसून सत्तेची मौज लुटली… तेव्हा महाराष्ट्र द्रोही असल्याची लाज वाटली नाही का ??? ..आता राजसाहेब ठाकरेंनी , मनसेने महायुतीला पाठींबा दिला तर मनोरुग्ण राऊतांचा तिळपापड झाल्याचं दिसतय…तुमचे उद्धव ठाकरे त्या ‘औरंग्याची औलाद’ अबू आझमीला कडेवर घेऊन नाचत आहेत याला महाराष्ट्रद्रोह म्हणत नाही का ???..या महाराष्ट्र द्रोही अबू आझमी बरोबर युती केल्यामुळे वंदनीय बाळासाहेब ठाकरे आणि प्रबोधनकारांच्या आत्म्याला किती वेदना झाल्या असतील.???
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…