Gajanan Kale : दुसऱ्यांच्या पक्षावर रेघोट्या मारण्यापेक्षा स्वतःचा पक्ष काढून दोन आमदार तरी निवडून आणा ; मनसे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष गजानन काळे

MNS Navi Mumbai President Gajanan Kale Target Amol Mitkari : मनसे प्रमुख राज ठाकरे यांना सुपारी बाद म्हणणाऱ्या अमोल मिटकरी यांना टी-शर्ट वर पेन लावणारा पावसाळी बेडूक ; गजानन काळे
मुंबई :- मनसे प्रमुख राज ठाकरे Raj Thackeray यांनी पुण्यातील पूरपरिस्थिची सोमवारी (29 जुलै) पाहणी केली. यावेळी त्यांनी पुण्याचे पालकमंत्री अजित पवारांसह Ajit Pawar शिंदे सरकारवर जोरदार टीका केली. धरणातील पाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात सोडलं जाणार याची कल्पनाही लोकांना नव्हती. त्यामुळे अनेक लोकांच्या घरात पाणी शिरलं. मला वाटतं की राज्य सरकारने या सर्व गोष्टीचा विचार करायला हवा. मुंबई बरबाद व्हायला वेळ लागला. मात्र, पुणे बरबाद व्हायला वेळ लागणार नाही. गेले अनेक वर्ष हे मी सांगतो आहे त्याचंच हे चित्र आहे. प्रत्येकवेळी राज्य सरकारकडून डेव्हलपमेंट प्लॅन येतो पण टाऊन प्लॅनिंग नावाची काही गोष्ट नसते, असे ते म्हणाले होते. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. दुसऱ्यांच्या पक्षावर रेघोट्या मारण्यापेक्षा स्वतःचा पक्ष काढून निदान दोन आमदार तरी निवडून आणावे असं खुले आव्हान मनसे जिल्हा अध्यक्ष गजानन काळे यांनी केले आहे.
अमोल मिटकरी यांची राज ठाकरे यांच्यावर जोरदार टीका
आमदार अमोल मिटकरी म्हणाले की, सुपारी बहाद्दर लोकांकडून जनतेने योग्य तो धडा घेतला आहे. त्यांनी नव्या नवरीचे नऊ दिवस म्हणून पुण्यात कुठे तरी भेट दिली आहे. ज्यांना साधा एनडीआरएफचा फुलफॉर्म माहिती नाही, त्यांनी आपत्ती व्यवस्थापनावर बोलावे, हा अलीकडच्या राजकारणातला सर्वात मोठा विनोद आहे. दिलेला शब्द पाळणाऱ्या अजित पवारांबाबत सुपारी बहाद्दरांनी बोलू नये. कारण हे सुपारी बहाद्दर, टोल नाका असेल किंवा भोंग्यांचे आंदोलन असेल, असे कोणतेही आंदोलन यशस्वी करू शकलेले नाही. त्यांची विश्वासार्हता आता संपली आहे, महाराष्ट्राच्या आतापर्यंतच्या राजकीय इतिहासात सर्वात अयशस्वी ठरलेल्या व्यक्तीने अजित पवारांच्या कार्यकतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणं म्हणजे सुर्याला वाकोल्या दाखवल्यासारखे आहे. Amol Mitkari Target Raj Thackeray
मनसे जिल्हाध्यक्ष गजानन काळे यांचे ट्विट
70 हजार कोटीचा घोटाळा करून नुसते पान सुपारी नाही, तर महाराष्ट्राला चुना लावला अजित दादांनी ( हे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहेत) तरी घासलेट चोर वर तोंड करून आम्हाला सुपारीबाज बोलतोय …अजित दादांच्या घरातल्या सदस्यांना एकदा नव्हे तर दोनदा निवडणुकीत पराभूत व्हावे लागले आणि कसल्या राजसाहेब ठाकरे यांच्या यश अपयशाच्या बाता मारतो रे घासलेट चोर …??? हिम्मत असेल तर स्वतः चा पक्ष काढून २ आमदार निवडून आणावेत तुमच्या दादांनी…!!! मग जाहीर मिशी कापून तुझ्या हातात देवू … उगाच पवार साहेबांचा पक्ष चोरून रेघोट्या मारू नका… पक्ष चोरून पण 1 खासदार निवडून आणताना दमछाक झाली तुमच्या दादांची (ते सुनील तटकरे पण स्वतःच्या हिम्मतीवर आले) टी शर्टवर पेन लावणारा पावसाळी बेडूक मटणकरी कुठला … आम्हाला शिकवायचं नाय, लायकीत राहायचं, लायकीत !!! असे ट्विट काळेंनी केले आहे.