Mira Road Credit Card Fraud News : ऑनलाइन फसवणूक झालेली रक्कम 1 लाख 55 हजार 195 रुपये परत करण्यात सायबर पोलीस ठाणेस यश
मिरा रोड :- क्रेडिट कार्ड च्या Online Credit Card Fraud नावाने ऑनलाईन शॉपिंग करण्याकरिता एक लिंक पाठवण्यात आली त्या लिंक मध्ये क्रेडिट कार्ड संदर्भातील संपूर्ण माहिती भरून फसवणूक झाली होती. ऑनलाइन फसवणुक होण्याच्या घटना सातत्याने वाढत त्या अनुषंगाने पोलिसांकडून कठोर पावले उचलले जात आहे. सायबर गुन्हेगारीला आळा घालण्याकरिता पोलिसांकडून वारंवार जनजागृती केली जात आहे.ऑनलाइन फसवणूक झाल्याचे पैसे परत मिळवून देण्यास पोलिसांना यश आले आहे.मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयातील कार्यक्षेत्रातील नवघर परिसरातील तक्रारदार राणे यांना त्यांच्या मोबाईलवर ऑनलाइन शॉपिंग करण्यासाठी एक लिंक आली होती. या लिंक वर क्रेडिट कार्ड संदर्भातील माहिती भरण्यास सांगितले त्यांच्या क्रेडिट कार्ड खात्यातून 1 लाख 55 हजार 195 रुपये कट झाले चा मेसेज आला आहे. या फसवणुकीबाबत त्यांनी सायबर विभागाला सायबर पोलीस ठाणे Mira Road Cyber Crime Department तक्रार दाखल केली.
त्यांच्या तक्रारीबाबत तात्काळ दखल घेवून तक्रारदार यांचे झाले व्यवहाराबाबत माहिती प्राप्त करण्यात आली. फसवणूक रक्कम ई-कॉमर्स साईट Flipkart खात्यावर जमा झाल्याचे दिसून आले. सायबर पोलीस ठाणेकडून तात्काळ पत्रव्यवहार करून व सातत्यपूर्ण पाठपुरावा करून नमूद फसवणूक रक्कम थांबविण्यात आली, फसवणूकीच्या रकमेची पूर्ण रक्कम म्हणजेच 1 लाख 55 हजार 195 रुपये पुन्हा तक्रारदार यांचे मुळ खात्यावर परत मिळविण्यात आली.
पोलीस पथक
अविनाश अंबुरे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे), मदन बल्लाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे), मि. भा. व. वि. पोलीस आयुक्तालय यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श सुजितकुमार गुंजकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील वाव्हळ, पोलीस उपनिरीक्षक प्रसाद शेनोळकर, महिला पोलीस अंमलदार सुवर्णा माळी, पोलीस अंमलदार राहुल बन, कुणाल साबळे, शुभम कांबळे यांनी पार पाडली आहे.
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…
Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…
Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…