मुंबई
Trending

माजी आमदार मुरकुटेंचा धनुष्यबाणाकडे पुनर्विचार; 725 समर्थकांसह शिंदे गटात जाहीर प्रवेश

Former MLA Bhanudas Murkute joins Shiv Sena : श्रीरामपूरमध्ये राजकीय भूकंप; माजी आमदार भानुदास मुरकुटे, नातू नीरज आणि माजी उपनगराध्यक्ष संजय छल्लारे यांचा शिवसेनेत शिंदे गटात प्रवेश

अहिल्यानगर :- श्रीरामपूर येथील राजकारणाला नव्या वळणावर आणणारी घटना शनिवारी ठाणे येथे घडली. श्रीरामपूरचे माजी आमदार भानुदास मुरकुटे, त्यांचे नातू व अशोक सहकारी साखर कारखान्याचे संचालक नीरज मुरकुटे, तसेच माजी उपनगराध्यक्ष संजय छल्लारे यांनी अनुक्रमे 650 व 75 समर्थकांसह शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश केला. Former MLA Bhanudas Murkute joins Shiv Sena

ठाणे येथील आनंद आश्रम येथे झालेल्या भव्य पक्षप्रवेश सोहळ्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माजी खासदार सदाशिव लोखंडे, माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, राजेंद्र देवकर यांसारखे प्रमुख नेते उपस्थित होते.या प्रसंगी एकनाथ शिंदे म्हणाले, “शिवसेना ही बाळासाहेब ठाकरे यांनी सुरू केलेली चळवळ आहे. आज मुरकुटे समर्थकांचा प्रवेश हा पक्षाच्या विचारधारेवर निष्ठा असलेल्या नेतृत्वाची भर आहे, आणि यामुळे श्रीरामपूर तालुक्यात पक्ष अधिक बळकट होईल.”

माजी आमदार मुरकुटे यांनीही आपले मत व्यक्त करताना सांगितले, “मी बाळासाहेब ठाकरे यांचे विचार मानणारा आहे. आज एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर आमचा पूर्ण विश्वास आहे. ग्रामीण भागाचा विकास, तसेच सामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी आम्ही शिंदे यांच्या सोबत खंबीरपणे उभे राहणार आहोत.”या प्रवेशामुळे श्रीरामपूर तालुक्यातील राजकारणात निश्चितच मोठी घडामोड घडली असून आगामी स्थानिक राजकारणावर याचा ठसा उमटण्याची शक्यता आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0