CP Radhakrishnan : निवडणूक आयोगाने अधिसूचना जारी केली, 9 सप्टेंबरला मतदान; एनडीएचे उमेदवार सी. पी. राधाकृष्णन यांच्याशी थेट लढत
ANI :- उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने अधिसूचना जारी केली असून, सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि विरोधी ‘इंडिया’ आघाडीमध्ये थेट लढत होणार आहे. एनडीएने महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांना उमेदवारी दिल्यानंतर, आता ‘इंडिया’ आघाडीने सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती सुदर्शन रेड्डी यांच्या नावाची घोषणा केली आहे.
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी मंगळवारी नवी दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीनंतर रेड्डी यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली. यापूर्वी, विरोधी पक्षांच्या बैठकीत अनेक नावांवर चर्चा झाली होती. यामध्ये, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांचे नाव सुचवले होते, तर द्रविड मुन्नेत्र कळघम (द्रमुक) पक्षाने इस्रोचे माजी शास्त्रज्ञ एम. अन्नादुराई यांचे नाव पुढे केले होते. मात्र, दीर्घ चर्चेनंतर सर्व प्रमुख नेत्यांनी सुदर्शन रेड्डी यांच्या नावावर सहमती दर्शवली.
या निवडणुकीसाठी नामांकन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, 21 ऑगस्टपर्यंत अर्ज दाखल करता येतील. 25 ऑगस्टपर्यंत अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आहे, तर मतदान 9 सप्टेंबर रोजी होणार आहे. या निवडणुकीत, भाजप आणि रालोआच्या संख्याबळामुळे राधाकृष्णन यांची निवड निश्चित मानली जात असली, तरी इंडिया आघाडीने एक मजबूत उमेदवार देऊन ही निवडणूक प्रतिष्ठेची बनवली आहे.
विशेष म्हणजे, मागील उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत चर्चेला विरोध करणाऱ्या तृणमूल काँग्रेसने यावेळी मात्र सुदर्शन रेड्डी यांच्या नावाला सहमती दर्शवली आहे.
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…