खोपोलीतील माजी नगरसेवक काळोखे हत्या प्रकरण: सुपारी घेणारा फरार आरोपी हडपसरमधून जेरबंद

Pune Police Latest Crime News : पुणे पोलिसांच्या वानवडी पथकाची मोठी कारवाई; सोनसाखळी चोरीचा तपास करताना उलगडले हत्येचे गुढ

पुणे :- खोपोलीचे माजी नगरसेवक मंगेश काळोखे यांच्या हत्येनंतर पसार झालेला आरोपी खालीद खलील कुरेशी (वय 23, रा. सय्यदनगर, हडपसर) याला वानवडी पोलिसांनी अटक केली आहे. हडपसरमधील हांडेवाडी भागात तो येणार असल्याची गोपनीय माहिती पोलीस उपनिरीक्षक अल्फाज शेख आणि सहायक निरीक्षक उमाकांत महाडिक यांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून त्याला ताब्यात घेतले.

हत्येची दिली सुपारी; आरोपीची कबुली

पोलिसी खाक्या दाखवताच खालीद कुरेशी याने खोपोलीत काळोखे यांची हत्या केल्याचे मान्य केले. ही हत्या त्याने त्याच्या दोन मित्रांच्या मदतीने केली असून, त्यासाठी त्यांना एका अज्ञात व्यक्तीने सुपारी दिली होती, अशी माहिती त्याने चौकशीत दिली. या कबुलीमुळे काळोखे यांच्या हत्येमागे मोठे कटकारस्थान असल्याचे स्पष्ट झाले असून, आता सुपारी देणाऱ्या मुख्य सूत्रधाराचा शोध पोलीस घेत आहेत.

सोनसाखळी चोरीच्या तपासात लागला धागा

विशेष म्हणजे, हडपसरमधील रामटेकडी औद्योगिक वसाहतीत एका ज्येष्ठ नागरिकाला मारहाण करून त्यांची सोनसाखळी चोरल्याचा तपास पोलीस करत होते. या प्रकरणात उमर नूर खान आणि साहिल हबीब फकीर यांना अटक करण्यात आली होती. त्यांच्या चौकशीत खालीद कुरेशीचे नाव समोर आले. पोलिसांनी जेव्हा त्याचा शोध सुरू केला, तेव्हा तो केवळ चोरीतच नव्हे, तर खोपोलीतील माजी नगरसेवकाच्या हत्येतील मुख्य आरोपी असल्याचे समोर आले.

कार्यक्षम पोलीस पथक

ही कारवाई अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील, उपायुक्त राजलक्ष्मी शिवणकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील, गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक संगीता जाधव, उपनिरीक्षक अल्फाज शेख आणि त्यांच्या पथकाने केली आहे. या अटकेमुळे खोपोली हत्या प्रकरणातील अनेक धागेदोरे हाती लागण्याची शक्यता आहे.

vivek

Recent Posts

Rohit Pawar : रोहित पवारांना ‘सीएकओ’चा फोन! विमान अपघाताच्या वादात स्मारकाची चर्चा; बारामती पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…

3 hours ago

मुंबई पालिकेचा ‘महा’बजेट: 80,952 कोटींचा विकास आराखडा! फेरीवाल्यांना आता ‘QR कोड’चे सुरक्षा कवच, तर अनधिकृत बांगलादेशींवर कठोर कारवाई

Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…

20 hours ago

मुंबईचा ‘महा’अर्थसंकल्प: 80,952 कोटींची विकासाची झेप! राखीव निधीतून 13 हजार कोटींचा अंतर्गत डोस, निवडणुकीनंतर पालिकेचा खजिना खुला

Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…

20 hours ago