पुणे, दि. १ सप्टेंबर, मुबारक जिनेरी (महाराष्ट्र मिरर) Firing on Vanraj Aandekar Breaking News
नाना पेठ भागातील माजी नगरसेवक वनराज आंदेकर Ex. Corporater Vanraj Aandekar यांच्यावर गोळीबार झाल्याने पुण्यात खळबळ उडाली आहे. आज दि. १ सप्टेंबर रोजी रात्रीच्या वेळी गोळीबार झाल्याने पुण्यात कायदा फक्त नावालाच उरल्याचे दिसत आहे. दिवसेंदिवस पुण्यातील कायदा व सुव्यस्थेची परिस्थिती ढासळताना दिसत आहे. Firing on Vanraj Aandekar १० ते १५ जणांच्या टोळक्याकडून दुचाकीवरून येत ४ ते ५ राउंड फायरिंग केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, नाना पेठेतील माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या राहत्या घराजवळ गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती आहे. मारेकऱ्यांनी ४ ते ५ राऊंड फायर करत माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. यात गोळी लागल्याने वनराज आंदेकर गंभीर जखमी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळावर धाव घेतली असून पुण्यातील परिस्थिती हाताळण्यासाठी वरिष्ठ अधीकारी लक्ष ठेवून आहेत.
गणेशोत्सवाच्या तोंडावर माजी नगरसेवकारवर गोळीबार करण्यात आल्याने मध्यभागात घबराट उडाली.
वनराज यांच्यावर वैमनस्यातून गोळीबार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. गोळीबारामागचे कारण समजू शकले नाही. वर्चस्वाच्या वादातून गोळीबार करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. नाना पेठेत आंदेकर टोळीचा दबदबा आहे.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…