Dharashiv Firing News : मंत्री तानाजी सावंत यांच्या पुतण्याच्या घराबाहेर गोळीबार
Dharashiv Latest Firing News : धनंजय सावंत यांच्या सोनारी येथील बंगल्यासमोर अज्ञात दोन व्यक्तींनी बंदुकीतून तीन फायर केले
धाराशिव :- राज्याचे आरोग्य मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. तानाजी सावंत Tanaji Sawant यांचे पुतणे धनंजय सावंत यांच्या घरासमोर काल रात्री दोन अज्ञात व्यक्तींनी गोळीबार Firing News केल्याने एकच खळबळ उडाली आहे.मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या CM Eknath Shinde Visit तोंडावर हा प्रकार घडल्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण पसरले होते. मात्र पोलिसांनी वातावरण नियंत्रणात आणले आहे.
काल रात्री 12 च्या दरम्यान धनंजय सावंत यांच्या सोनारी येथील बंगल्यासमोर अज्ञात दोन व्यक्तींनी बंदुकीतून तीन फायर केले. यावेळी धनंजय सावंत हे त्यांच्या घरामध्ये होते तर त्यांचे सुरक्षा रक्षक बाहेर होते.
गोळीबार करताच अज्ञात फरार झाले असून धनंजय सावंत आणि त्यांचे सुरक्षा रक्षक सुरक्षित आहेत. गोळीबार कोण केला हे अद्याप निश्चित झाले नसून याबाबत धनंजय सावंत व त्यांच्या सुरक्षारक्षकांना गोळीबार कोणी केला हे माहित नव्हते. याबाबत आंबी पोलीस स्टेशनला Ambi Police Station धनंजय सावंत यांचे सुरक्षा रक्षक तक्रार देण्यासाठी गेले असून तक्रार देण्याची प्रक्रिया सुरू आहे.