क्राईम न्यूज

दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार: 8-10 गोळ्या झाडल्या, हल्लेखोर परदेशी बनावटीच्या पिस्तुलाचा वापर करत होते’

Disha Patani Firing Case Update : अज्ञात हल्लेखोरांनी दुचाकीवरून केला हल्ला; ‘गोल्डी ब्रार गँग’ने घेतली हल्ल्याची जबाबदारी

ANI :- बॉलिवूड अभिनेत्री दिशा पाटनी आणि तिची बहीण खुशबू पाटनी यांच्या बरेली येथील घरावर शुक्रवारी (12 सप्टेंबर) पहाटे दोन अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. Disha Patani Firing Case Update या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. ‘रोहित गोदारा गोल्डी ब्रार गँग’ने सोशल मीडिया पोस्ट करून या हल्ल्याची जबाबदारी घेतल्याचे समोर आले आहे. या घटनेवर आता दिशाचे वडील, निवृत्त पोलीस अधिकारी जगदीश सिंह पाटनी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

जगदीश पाटनी यांची प्रतिक्रिया

एएनआयशी बोलताना जगदीश पाटनी म्हणाले, “माझ्या घरावर दोन अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. पोलीस तपास करत आहेत आणि त्यांना पकडण्याचे सर्व प्रयत्न सुरू आहेत. बरेली पोलीस, एसएसपी आणि एडीजी सर्वजण या प्रकरणाचा तपास करत आहेत.”

गोळीबाराच्या स्वरूपाबद्दल बोलताना ते म्हणाले, “ज्या गोळ्या झाडण्यात आल्या त्या स्वदेशी बनावटीच्या नाहीत, तर विदेशी बनावटीच्या आहेत. मला वाटते 8 ते 10 राऊंड फायरिंग झाली.” गोळीबारानंतर आपण कसेबसे आडोशाला उभे राहून जीव वाचवला, असेही त्यांनी सांगितले.

‘हा आमच्याविरोधातला कट आहे’

गोळीबाराची जबाबदारी ‘गोल्डी ब्रार गँग’ने घेतल्याची माहिती त्यांना सोशल मीडियावरून मिळाली असली तरी, पोलिसांच्या माहितीची प्रतीक्षा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या हल्ल्यामागे त्यांची मुलगी खुशबूच्या एका वक्तव्याचा विपर्यास करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.

“माझ्या मुलीच्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला. आम्ही सनातन धर्म मानतो. आम्ही आचार्य, गुरुजी, साधू-संतांचा आदर करतो. जर कोणी खुशबूच्या वक्तव्याचा विपर्यास करून चुकीच्या पद्धतीने दाखवून असं करत असेल, तर हा आमच्याविरोधातला कट आहे,” असे जगदीश पाटनी म्हणाले.

vivek

Recent Posts

मुंबई पालिकेचा ‘महा’बजेट: 80,952 कोटींचा विकास आराखडा! फेरीवाल्यांना आता ‘QR कोड’चे सुरक्षा कवच, तर अनधिकृत बांगलादेशींवर कठोर कारवाई

Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…

16 hours ago

मुंबईचा ‘महा’अर्थसंकल्प: 80,952 कोटींची विकासाची झेप! राखीव निधीतून 13 हजार कोटींचा अंतर्गत डोस, निवडणुकीनंतर पालिकेचा खजिना खुला

Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…

16 hours ago

Supriya Sule : राज्यसभेचा ‘पेच’ सुटणार? शरद पवारांच्या उमेदवारीसाठी सुप्रिया सुळेंचे ‘दिल्ली मिशन’; तर ठाकरेंच्या शिवसेनेचाही जागेवर दावा

•पुढील दोन दिवस पवारांची प्रकृती तपासणी | सुप्रिया सुळे काँग्रेस श्रेष्ठींना भेटणार | 'आदित्य' हट्ट…

21 hours ago