Aaditya Thackeray On Firing at Badlapur Railway Station : आदित्य ठाकरे यांनी राज्यातील कायदा व सुव्यवस्थावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे
मुंबई :- बदलापूरच्या रेल्वे स्थानकावरील एक Firing at Badlapur Railway Station धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. यात एक तरुण स्थानकावरच गोळीबार करत असल्याचे दिसत आहे. ही घटना सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास घडली आहे. या गोळीबाराच्या घटनेनंतर परिसरात तसेच प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या सर्व प्रकारावर शिवसेना ठाकरे गटाचे नेते आमदार आदित्य ठाकरे Aaditya Thackeray यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. राज्यात कायदा व सुव्यवस्थेच्या परिस्थितीवर आदित्य ठाकरे यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
आदित्य ठाकरे यांनी बदलापूर रेल्वे स्थानकावर झालेल्या गोळीबार प्रकरणावर ट्विट करत संताप व्यक्त केला. महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्था दिवसेंदिवस ढासळतच चालली आहे. स्त्रियांवर होणारे अत्याचार असोत, कोयता गँगसदृश घटना असोत की वारंवार होणारे गोळीबार महाराष्ट्रातील शहरं आणि गावं या गुन्हेगारीने ग्रासून गेलेली आहेत, असे म्हणत ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र डागले आहे.
आदित्य ठाकरे म्हणाले की, काल तर बदलापूर रेल्वे स्थानकावर गोळीबार झाला आणि राज्याचे गृहमंत्री मात्र पक्ष फोडणे, कुटुंब तोडणे, खोटा इतिहास शिकवणे, प्रचार करणे यातच व्यस्त आहेत. आमच्या सुसंस्कृत महाराष्ट्राची वाट लावली या शिंदे-भाजपाने, अशा शब्दात आदित्य ठाकरे यांनी शिंदे-भाजपा सरकारवर घणाघात केला आहे.
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…
Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…
Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…